सुळगा हिंडलग्यात मॅरेथॉन उत्साहात
वार्ताहर/हिंडलगा
सुळगा (हिं.) येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी संघ पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा केंद्र व सांस्कृतिक मंच यांच्यावतीने सालाबादप्रमाणे दिवाळीनिमित्त मिनी मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. 3 कि.मी. मिनी मॅरेथॉन व 400 मी. धावण्याच्या खुल्या पुरूष गटासाठी आयोजिलेल्या स्पर्धेत मॅरेथॉन या विभागात नितीन बेळगावकर-जाफरवाडी प्रथम, आदित्य पाटील (जाफरवाडी) द्वितीय, सिद्धार्थ रुटकुटे (कडोली) तृतिय, प्रसाद डोंबले (हिंडलगा) चौथा तर 400 मी. विभागात आदित्य पाटील प्रथम, सिध्दार्थ रुटकुटे दुसरा, नितीन बेळगावकर तिसरा तर ओमकार जाधव (गडहिंग्लज) यांनी चौथा क्रमांक मिळविला. स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक चेअरमन अशोक वाय. पाटील, उद्घाटन म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले, शिवाजी अतवाडकर, एपीएमसी माजी सदस्य बाळू देसूरकर, मधुरा हॉटेलचे मालक मधू बेळगावकर इतर मान्यवर उपस्थित होते. प्रकाश बेळगुंदकर यांनी प्रास्ताविक केले.
व्हा. चेअरमन बी. एन. बेनके, संचालक निंगाप्पा देसूरकर, लक्ष्मण खांडेकर, यल्लाप्पा पाटील, शिवाजी पाटील यांच्या हस्ते उपस्थितांनी स्वागत केले. प्रमुख वक्ते मनोज पावशे उपस्थित होते. फर्मचे मालक परशराम कदम यांनी दीपप्रज्वलन केले. या स्पधेंतील विजेत्या स्पर्धकांचे प्रायोजक महेश पाटील, राहुल देसूरकर, शंकर पाटील, नागेश देसूरकर, मारुती पाटील, बाळू पाटील, यल्लाप्पा पाटील, लक्ष्मण पाटील, ह.भ.प. यल्लाप्पा कदम उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना यांच्या हस्ते रोख रक्कम, चषक, स्मृतिचिन्हृ प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनोज पावशे, आर. एम. चौगुले, एन. वाय. चौगुले यांची भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टोपाण्णा पाटील तसेच संचालक, सल्लागार, सभासद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.