पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
भाजपा हलगा विभाग यांच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन
वार्ताहर/किणये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त हलगा येथे भाजपा विभाग यांच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा हलगा तारिहाळ रस्त्यावर मोठ्या उत्साहात झाल्या. स्पर्धेला तालुक्याच्या विविध भागातील स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. माजी आमदार संजय पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सुदृढ आरोग्यासाठी रोज नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे तसेच व्यायामामध्ये धावणे हा उत्तम व्यायामाचा प्रकार आहे त्यामुळे या भागातील तरुणांनी व कार्यकर्त्यांनी मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन केल्यामुळे पाटील यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सदानंद बिळगोजे, तवनाप्पा पायाका, संजू हुडेद, बाळू गोरली, गजानन नाईक, अनंत बेळगोजी, सचिन पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
या स्पर्धा दोन विभागात घेण्यात आल्या लहान गटामध्ये मुलांमध्ये बस्तवाड येथील मयूर मुतगेकर यांने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच गणपत मुतगेकरने द्वितीय क्रमांक, यल्लाप्पा मरगानाचे याने तृतीय क्रमांक मिळविला. लहान गट मुलींमध्ये भक्ती गुरव हिने प्रथम क्रमांक मिळविला कलावती चांगो मुतगेकर हिने द्वितीय क्रमांक, श्रुती मुतगेकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. खुल्या गटामध्ये मास्तमर्डी येथील चंद्रकांत कोलकर यांने प्रथम क्रमांक मिळविला.तारिहाळ येथील बसवराज नागाप्पा इटगी यांने द्वितीय क्रमांक व मास्तमरडी येथील सुरज कुरंगी याने तृतीय क्रमांक मिळविला. या विजेत्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.