महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सीरियल किलिंगवर येतेय मराठी सीरिज

06:41 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अभिनेत्री सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, आशुतोष गोवाकरी अशा भिन्न शैलीच्या कलाकारांची एक सीरिज लवकरच पहायला मिळणार आहे. सोनी लिववर एक क्राइम थ्रिलर सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. 70 च्या दशकात घडलेल्या सत्यघटनेवर आधारित ही सीरिज असणार आहे.

Advertisement

‘मानवत मर्डर्स’ असे या वेबसीरिजचे नाव असून ती 4 ऑक्टोबरपासून सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. ‘मानवत मर्डर्स’मध्ये 1972-74 या काळात महाराष्ट्रासह अवघ्या देशात दहशत निर्माण करणाऱ्या एका सीरियल किलिंगचे चित्रण करण्यात आले आहे. मानवतमध्ये एका पाठोपाठ चिमुरड्या मुलींचे आणि महिलांचे खून झाले होते. कोणत्या कारणासाठी हे खून होत आहेत याचा दीर्घकाळापर्यंत खुलासाच झाला नव्हता. मात्र मुंबईहून आलेल्या पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे ठरविले होते. आशीष बेंडे दिग्दर्शित आगामी सीरिजमध्ये राज्यात घडलेल्या या भयानक प्रकरणाची कहाणी दर्शविण्यात आली आहे. मुंबईतील पोलीस अधिकारी डीसीपी रमाकांत कुलकर्णी यांना भारताचे शेरलॉक होम्स म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्याच नेतृत्वाखालील पथकाने मानवत गावातील खुनाच्या घटनांचा तपास केला होता. या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आशुतोष गोवारीकर आहेत.  रमाकांत कुलकर्णी यांच्या ‘फूटप्रिंट्स ऑन द सॅन्ड ऑफ क्राइम’ या आत्मचरित्रावर आधारित ही सीरिज असणार आहे. या सीरिजमध्ये मयुर खांडगे, सौमित्र, शार्दुल सरफा, उमेश जगताप, पूर्णानंद वांढेकर, पायल जाधव, सागर यादव, अशोक प्रभाकर हे कलाकारही दिसून येतील.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article