For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सैफ सोबत झळकणार करिना

06:32 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
सैफ सोबत झळकणार करिना
Advertisement

प्रभासच्या चित्रपटासाठी निवड झाल्याची चर्चा

Advertisement

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरने स्वत:च्या कारकीर्दीची 25 वर्षे पूर्ण केली आहेत. अभिनेत्रीचा ‘द बकिंघम मर्डर्स’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट फारसा यशस्वी ठरलेला नाही. करिनाने आता पती सैफ अली खानसोबत काम करण्यावरुन मतप्रदर्शन केले आहे.

सैफसोबत लवकरच काम करता येणार असल्याची अपेक्षा आहे. सैफसोबत काम करणे पसंत करेन, असे करिनाने म्हटले आहे. करिना आणि सैफ या जोडीला प्रभासच्या स्पिरिट या चित्रपटासाठी निवडण्यात आल्याचे समजते. करिना या चित्रपटात प्रभासची नायिका म्हणून झळकणार आहे. तर सैफ अली खान यात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. निर्मात्यांनी अद्याप अधिकृतपणे कुठलीच घोषणा केलेली नाही. करिना आणि सैफने ओमकारा, एजंट विनोद, कुर्बान आणि टशन यासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. करिना आगामी काळात अनेक चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. यात क्रू या चित्रपटाचा सीक्वेल देखील सामील आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.