For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रत्नागिरीमध्ये मराठी साहीत्य संमेलनाचे उद्धाटन! शहरात भव्य विठ्ठलमुर्तीचे अनावरण

06:43 PM Feb 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
रत्नागिरीमध्ये मराठी साहीत्य संमेलनाचे उद्धाटन  शहरात भव्य विठ्ठलमुर्तीचे अनावरण
Ratnagiri Vitthal Murthy
Advertisement

रत्नागिरी शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात 12 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी केले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष ह. भ. प. माधव महाराज शिवणीकर, वारकर साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील, ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, ह.भ.प. मनोहर महाराज आवटी, राजेश ओसवाल, निलेश महाराज, देवीदास महाराज, श्रीमंत शितोळे सरकार आदी उपस्थित होते.

Advertisement

सायंकाळी पायी दिंडी आणि श्रीमंत सरकार शितोळे यांचे हिरा व मोती या अश्वांनी युक्त रिंगण पार पडले. शिर्के उद्यानात नगरपरिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण समस्त वारकरी आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या लोकार्पण सोहळ्याला संत साहित्य संमेलनाध्यक्ष ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास, श्रीमंत सरदार उर्जितसिंह राजे शितोळे, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने श्री विठ्ठलाची चांदीची मूर्ती देऊन पालकमंत्री सामंत यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :

.