For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रियांका चोप्राकडून मराठी चित्रपटाची निर्मिती

06:08 AM Sep 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रियांका चोप्राकडून मराठी चित्रपटाची निर्मिती
Advertisement

पाणी’ चित्रपट 18 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

Advertisement

प्रियांका चोप्रा ही जागतिक अभिनेत्री असण्यासोबत एक निर्माती देखील आहे. पर्पल पेबल पिक्चर्स बॅनर अंतर्गत तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता तिच्या प्रॉडक्शनकडून मराठी चित्रपट ‘पाणी’ निर्माण करण्यात आला आहे. प्रियांकाने स्वत:च्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर या चित्रपटाचा मोशन टीझर शेअर केला आहे. प्रियांकाचा हा चित्रपट 18 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाकरता प्रियांकाच्या पर्पल पेबल पिक्चर्ससोबत राजश्री मराठी प्रॉडक्शनने भागीदारी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदिनाथ कोठारे यांनी केले असून याची कहाणी हनुमंत केंद्रे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. हनुमंत यांनी कशाप्रकारे स्वत:च्या गावातील पाण्याची समस्या निकालात काढली यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. आदिनाथ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत असल्याचे समजते. प्रियांका चोप्राकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याने याला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.