मराठा स्पोर्ट्स, मोहन मोरे, हनुमान स्पोर्ट्स संघ विजयी
बेळगाव : मराठा स्पोर्ट्स बेळगाव आयोजित महांतेश कवटगीमठ चषक ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गुरूवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात मराठा स्पोर्ट्स ग्रामीण एवायएम अनगोळ, हनुमान स्पोर्ट्स व मोहन मोरे संघाने आपल्या प्रतिस्पर्धांवर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. अभिजीत पाटील, जावेद धामणेकर, प्रितम भारी, सुनील मंगलार्ती व परेश हरेकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मालीनी सिटी मैदानावर खेळविण्यात आलेल्या गुरूवारच्या पहिल्या सामन्यात मराठा स्पोर्ट्स ग्रामीण संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडीबाद 149 धावा केल्या. त्यात अभी पाटीलने 69, उमेश गोरलने 31 तर अभिजीत पाटीलने नाबाद 21 धावा केल्या. शिवनेरी स्पोर्ट्स अनगोळतर्फे प्रविण, स्वप्नील व मनोहर यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना शिवनेरी स्पोर्ट्स अनगोळरने 8 षटकात 7 गडीबाद 64 धावा केल्या. त्यात विवेकने 34, तर प्रविणने 15 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्सतर्फे अभिजीत पाटीलने 4 धावात 3, सुशांत कोवाडकरने 6 धावात 3 गडीबाद केले.
दुसऱ्या सामन्यात स्टार संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडीबाद 57 धावा केल्या. त्यात अन्सर शहा, नफास सिद्दीकी यांनी प्रत्येकी 18 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे प्रितम बारी, पंकज पाटील, किरण मोरे यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना मेरे मोहन संघाने 5.1 षटकात 4 गडीबाद 63 धावा करून सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात प्रितम बारीने 23, तर श्ऱेयस कदमने 21 धावा केल्या. स्टारतर्फे मायराज खानने 3 गडीबाद केल्या. तिसऱ्या सामन्यात अलरझा संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडीबाद 85 धावा केल्या. त्यात अजर गवसने 31, शाकीबने 20 धावा केल्या. हनुमान स्पोर्ट्सतर्फे संतोष, भीम, शशी, सुनील यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हनुमान स्पोर्ट्सने 7.3 षटकात 2 गडीबाद 86 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात सुनीलने नाबाद 55, भीमने 25 धावा केल्या. अलरजातर्फे परवेज माडीवालेने 2 गडीबाद केले.
चौथ्या सामन्यात एवायएम अनगोळने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडीबाद 83 धावा केल्या. त्यात जावेद धामणेकर व मुदस्सर यांनी प्रत्येकी 20, रोहीत सुर्यवंशीने 18 धावा केल्या. इंडियन सोल्जरतर्फे सागरने 2, विनोद व विनायक यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंडियन सोल्जरने 8 षटकात 4 गडीबाद 79 धावा केल्या. त्यात जग्गुने 33, संतोष बांडीने 27 धावा केल्या. एवायएमतर्फे शरीफ मुलानी व अनिकेत मानी यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. पाचव्या सामन्यात एवायएम अनगोळने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 55 धावा केल्या. त्यात अमोल भोजने 14, अनिकेत बारेने 15 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे परेश आरेकरने 16 धावात 3, प्रितम बारी, पंकज पाटील, अनिकेत राऊत यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहन मोरे संघाने 3.3 षटकात 1 गडीबाद 57 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात ओंकार किनीने नाबाद 21, ओंकार देसाईने नाबाद 11 धावा केल्या. एवायएमतर्फे शरीफ मुल्लाने 1 गडीबाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे शितल पाटील, विशाल गवालकर, सारंग राघोचे, विठ्ठल काकतीकर, अनंत माळवी, शिरीस धोंगडी, नितीन बाळेकुंद्री, सदानंद मत्तीकोप्प, मोहित हुबळीकर यांच्या हस्ते अभिजीत पाटील, जावेद, प्रितम बारी, सुनील मंगलार्ती, परेश आरेकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
शुक्रवारचे सामने : 1) कलमेश्वर स्पोर्ट्स धामणे वि. साईराज वॉरियर्स सकाळी 9 वा. 2) डिंगडाँग वि. शिवसेना मुतगा 10.30 वा. 3) बंगाली टायगर वि. अथणी सिटी 12 वा. 4) एसकेओ बॉस वि. हरियाना स्पोर्ट्स दु. 1.30 वा, 5) डेपो वारियर्स वि. दुर्गा स्पोर्ट्स दु. 3 वा.