For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठा स्पोर्ट्स, कांतारा बॉईज विजयी

11:13 AM Nov 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
मराठा स्पोर्ट्स  कांतारा बॉईज विजयी
Advertisement

बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या विविध सामन्यात मुरगन स्पोर्ट्स क्लब खानापूरने बालाजी स्पोर्ट्सचा, मराठा स्पोर्ट्सने दक्ष स्पोर्ट्स,निलजीचा कांतारा बॉईजने युवराज स्पोर्ट्सचा तर मराठा स्पोर्ट्सने मुरगन बॉईजचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश मिळविला. दत्ता बुवा,अर्जुन भोसले, रवी कोप्पद, जगन रेड्डी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Advertisement

व्हॅक्सिन डेपो मैदानावर आयोजित साईराज चषक क्रिकेट स्पर्धेत सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात मुरगन बॉईजने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 66 धावा केल्या. त्यात फईमने 20 तर सिद्धूने 15 धावा केल्या. बालाजी स्पोर्ट्सतर्फे प्रकाशने 16 धावात 3 तर गणेशने 15 धावात 2 गडी बाद केले. त्यानंतर बालाजी स्पोर्ट्स संघाने 8 षटकात 6 गडी बाद 52 धावा केल्या.कुमार जे. याने 1 षटकार, 2 चौकारासह 25 तर गणेशने नाबाद 11 धावा केल्या. मुरगनतर्फे दत्ताने 14 धावात 3 तर विशालने 2 गडी बाद केले.

दुसऱ्या सामन्यात मराठा स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 93 धावा केल्या.अर्जुन भोसलेने 3 षटकार, 5 चौकारासह 25 चेंडूत 51, अमोल निलगुडेने 2 षटकार 1 चौकारासह 23 धावा केल्या. दक्ष निलजीतर्फे संजयने 10 धावात 4 तर निखीलने 2 गडी बाद केले. त्यानंतर दक्ष स्पोर्ट्स निलजीने 8 षटकात 6 गडी बाद 51 धावा केल्या. प्रमोदने 2 षटकार 1 चौकारासह नाबाद 21 तर अभिजीतने 14 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्सतर्फे जगन व समीरने प्रत्येकी 2 गडी बाद केले.

Advertisement

तिसऱ्या सामन्यात युवराज स्पोर्ट्सने 8 षटकात सर्व गडीबाद 31 धावा केल्या. तर ज्ञानेश्वरने 10 धावा केल्या. कांतारा बॉईजतर्फे रवि कोप्पदने 11 धावात 4 तर प्रणित व दर्शन यानी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर कांतारा बॉईजने 5 षटकात 2 गडी बाद 35 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. संतोषने 18 धावा केल्या. चौथ्या सामन्यात मराठा स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 9 गडी बाद 58 धावा केल्या. अमोलने 12 तर अर्जुन भोसलेने 11 धावा केल्या. मुरगनतर्फे तुकारामने 6 धावात तीन तर विशाल व दत्ता यानी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर मुरगन खानापूरने 8 षटकात  7 गडी बाद 51 धावा केल्या.  विशालने 3 षटकारासह 22 तर दत्ताने 10 धावा केल्या.

Advertisement
Tags :

.