महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मराठा मंडळचे तालुका क्रीडा स्पर्धेत यश

10:33 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर : मराठा मंडळ बेळगाव संचलित मराठा मंडळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे तालुका पातळीवरील क्रीडास्पर्धेत यश संपादन केले आहे. प्राथमिक विभागामध्ये सलोनी मादर 100 मी. धावणे प्रथम. लिंगराज लमानीने थाळीफेक प्रथम, विठ्ठल कोकरेने गोळाफेक द्वितीय, सायली अनगडकर 200 मी.धावणे व 400 मी. धावणे द्वितीय तसेच माध्यमिक विभागामध्ये वेदांत होसुरकर 800 मी. धावणे प्रथम, ज्ञानदेव शिंदे 1500 मी. धावणे प्रथम, वेदांत होसुरकर 1500 मी. धावणे द्वितीय, 110 मी. अडथळा शर्यतीत नमन पाटील प्रथम व आशिष हलगेकर द्वितीय, 4×400 रिले प्रथम, थ्रोबॉल मुलांचा गट द्वितीय, थ्रो बॉल दसरा स्पोर्ट्स खुला गट द्वितीय, कबड्डी दसरा स्पोर्ट्स खुला गट तृतीय, कराटे सृजन प्रथम क्रमांक, कुस्ती मुलींचा गट भक्ती मनोहर गावडा 43 किलो वजन गटात तालुका व जिल्हा पातळीवर प्रथम, तनुजा रवींद्र गुरव 48 किलो गटात तालुका व जिल्हा पातळीवर प्रथम वरील दोन्ही विद्यार्थिनींची राज्य पातळीवर कुस्तीसाठी निवड  झाली आहे. नमन पाटील 45 किलो गटात प्रथम व जिल्हा पातळीवर द्वितीय, योगामध्ये हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर निवड  झाली आहे. बुद्धिबळसाठी हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article