महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मराठा मंडळ, ज्ञान प्रबोधन मंदिरची विजयी सलामी

10:32 AM Dec 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

34 व्या दासाप्पा शानभाग चषक क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित 34व्या दासाप्पा शानभाग चषक सोळा वर्षाखालील मुलांच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवसी मराठा मंडळ हायस्कूल संघाने सेंट झेवियर संघाचा 29 धावानी तर ज्ञान प्रबोधन मंदिर संघाने सेंट पॉल्स हायस्कूल खानापूर संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली. जितीन दुर्गाई, सुजल गोरल याना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावर सकाळी झालेल्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे आर डी शानभाग यांच्या हस्ते खेळपट्टीचे पूजन करत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी किरण शानभाग, अजित शानभाग, संदीप शानभाग, ध्रुव शानभाग, पूर्वी योग,  युती, जिमखाना उपाध्यक्ष संजय पोतदार व जिमखाना सचिव प्रसन्ना सुंठणकर, मिलिंद चव्हाण, महांतेश देसाई उपस्थित होते.

Advertisement

आजच्या पहिला सामन्यात मराठा मंडळ हायस्कूल संघाने सेंट झेवियर संघाचा 29 धावांनी पराभव केला. मराठा मंडळ हायस्कूल संघाने  प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 6 बाद 130 धावा केल्या. त्यात जितिन दुर्गाइने 4 चौकारासह 53,  वरदराज पाटीलने 39 धावा केल्या. सेंट झेवियर्स तर्फे परीक्षेत वांडकर 2 तर आऊष काळभैरव यांनी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सेंट झेवियर्स संघाने 25 षटकात 5 गडी बाद 101 धावाच केल्या. त्यात परीक्षेत वांडकरने 3  चौकार 29, आऊष काळभैरवने 2 चौकारासह 18, इंदर प्रजापतने 17 व अवधूत काळे यांनी 14 धावा केल्या. मराठा मंडळ तर्फे वरदराज पाटील 2, नमन बडवाण्णाचे व जितीन दुर्गाई यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

दुसऱ्या सामन्यात ज्ञान प्रबोधन मंदिर संघाने सेंट पॉल्स हायस्कूल खानापूर संघाचा 66 धावांनी पराभव केला. ज्ञान प्रबोधन मंदिर संघाने प्रथम फलंदाजी करताना 23.1 षटकात सर्व गडीबाद 122 धावा केल्या. त्यात आयुष प्रभू आजगावकरने 25 तर आयुषेकरने 24 धावा केल्या. सेंट पल्स संघातर्फे श्रेयस पाटीलने 3, देवाप्पा देऊळकर व सुरज कश्यप यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सेंट पॉल संघाचा डाव 20.4 षटकात 56 धावात आटोपला. त्यात कार्तिके पाटीलने 3 चौकारासह 20 धावा केल्या. ज्ञान प्रबोधन मंदिर तर्फे सुजल गोरलने 3 तर आयुष सरदेसाई व वेदांत बिर्जे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article