मराठा मंडळ कॉलेजचे क्रीडा स्पर्धेत यश
बेळगाव : बेळगाव पदवीपूर्व शिक्षण खाते,उपनिर्देशक व ज्योती पदवीपूर्व कॉलेज बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या क्रीडा स्पर्धांमध्ये मराठा मंडळ पदवीपूर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. अॅथलेटिक्समध्ये तिहेरी उडीमध्ये सुमीत तारीहाळकर व चैतन्या जायान्नाचे व साखळी गोळाफेकमध्ये संतोषी कदम यांनी तृतीय क्रमांक मिळविळा. त्याचबरोबर जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये 1) ओमकार पाटील व तनुजा कोकीतकर 2) रेणुका कामती व नेहा पोटे, लाठी स्पर्धेमध्ये प्रिया जोमने व कीर्ती चौगुले यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या विद्यार्थिनींची राज्यपातळीवर निवड झाली आहे. खो-खो सांघिक स्पर्धेमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक मिळवला. जिल्हास्तरीय खो-खो मध्ये निवड झालेले विद्यार्थी सुमीत तारिहाळकर, भावेश जाधव, शुभम चौगुले, कुणाल सांबरेकर व विद्यार्थिनी रेश्मा कुगजी, मानसी पवार, प्रियांका गावडे, स्वप्ना कोकितकर, मिताली खांडेकर या विद्यार्थ्यांची पुन्हा जिल्हा पातळीवर निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचे प्रोत्साहन तसेच प्राचार्या कविता पाटील व क्रीडाशिक्षक प्रवीण गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.