Satara : सासपड्यातील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार घटनेचा मराठा क्रांती मोर्चाचा तीव्र निषेध!
शिवतीर्थावर मराठा क्रांती मोर्चाकडून तीव्र निषेध
सातारा : सातारा तालुक्यातील सासपडे गावात तेरा वर्षांच्या शाळकरी मुलीचा वरवंट्याने निर्घृण खून झाल्याची घटना समोर आली आहे. या अमानुष घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
साताऱ्यातील पोवई नाका शिवतीर्थावर मराठा क्रांती मोर्चाकडून आज तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहून आरोपीला तातडीने अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी केली
या घटनेत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही मोर्चाकडून करण्यात आला. जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. सासपडेतील या हृदयद्रावक घटनेमुळे साताऱ्यात संतापाचं वातावरण आहे. न्यायाच्या मागणीसाठी आता जनआक्रोश उफाळून आला आहे.