महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये ‘मराठा दिन’

10:46 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देशसेवेसाठी बलिदान दिलेल्या जवानांना श्रद्धांजली

Advertisement

बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये रविवारी मराठा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एमएलआयआरसीचे मेजर जनरल हितेश भल्ला यांच्या हस्ते युद्ध स्मारकाला पुष्पचक्र वाहण्यात आले. देशसेवेसाठी बलिदान दिलेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. 4 फेब्रुवारी हा दिवस मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे मराठा दिन म्हणून पाळला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तानाजी मालुसरे यांनी आपल्या जीवाची बाजी लावत कोंढाणा किल्ला सर केला. याची आठवण म्हणून दरवर्षी मराठा दिन पाळण्यात येतो. मराठा जवानांच्या साहसाचे दर्शन घडविण्यासाठी मेजर संदीप यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथील किल्ला ते मराठा रेजिमेंटल सेंटरपर्यंत सायकल मोहीम काढण्यात आली. यावेळी वीरनारी व वीरमातांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडर ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी व इतर अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article