महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गडहिंग्लज मधील मराठा बांधव देणार मुंबईत धडक

07:49 PM Jan 24, 2024 IST | DHANANJAY SHETAKE
गडहिंग्लज मधील मराठा बांधव आंदोलनास पाठींबा दर्शविताना
Advertisement

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणावर कायम असून ते 26 जानेवारी पासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. राज्यभरातून या आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळत असून ह्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्यासाठी मराठा समाजाची गडहिंग्लज येथे मराठा बोर्डिंगच्या प्रांगणात बैठक पार पडली. त्या बैठकीत गडहिंग्लजहून मोठ्या संख्येने मराठा आरक्षण आंदोलन कार्यकर्ते मुंबईला धडकणार आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष किरणराव कदम होते.अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष सुधीर उर्फ आप्पा शिवणे निमंत्रक होते.बैठकीत चंद्रकांत सावंत यांनी मराठा आरक्षणाची सद्यस्थिती आणि आंदोलनाची पुढील दिशा या संदर्भात मार्गदर्शन केले.संजय पाटील,एल.डी.पवार, शिवाजी कुराडे, उत्तम देसाई, युवराज बरगे यांनी विविध सुचना मांडल्या. बैठकीला अमर पोटे, शैलेश इंगवले, संदिप सावरकर,संतोष चौगुले, सतीश हळदकर, विश्वास खोत, शंकर सावंत,विजय केसरकर ,बाबासाहेब पाटील, धनंजय मोरबाळे,अशोक खोत, इत्यादी मान्यवर व बहुसंख्य मराठा बांधव उपस्थित होते. शनिवार दिनांक 27 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता पुढील नियोजनासाठी मराठा बोर्डिंगमध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#26 january#belgaum#maratha #manojjarange
Next Article