जिल्ह्यातील चार नवनगरांचे नकाशे तयार
मान्यतेसाठी वरिष्ठ कार्यालयास सादर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे नवनगरांचा विकास करण्याची जबाबदारी,जिह्यातील देवके, दोडावण, नवीन गणपतीपुळे, आंबोळगड ही नवनगरे घोषित
रत्नागिरी : कोकण दुतगती आणि समुद्रकिनारा महामार्गालगतच्या क्षेत्र विकासासाठी महाराष्ट्र पादेशिक आणि नगर रचना विभागाकडून जिह्यातील देवके, दोडावण, नवीन गणपतीपुळे, आंबोळगड या चार ठिकाणी नवनगरे अधिसूचित करण्यात आल्यानंतर या नवनगरांचे नकाशे बनवण्याचे काम पूर्ण झाले आहेत. हे नकाशे रत्नागिरीतून वरिष्ठ कार्यालयाला मान्यतेसाठी सादर झाले आहेत़ राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिह्यातील 722 गावांपैकी 105 महसुली गावातील क्षेत्र नवनगरांसाठी निशात करण्यात आले आहे. नियोजन पाधिकरण म्हणून जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे. कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चारही जिह्यातून जाणारा कोकण द्रुतगती महामार्ग तसेच कोकण किनारपटी महामार्गालगत एकूण 13 नवनगरे स्थापन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर आहे.
जिह्यात राजापूरमधील 13 गावांचे आंबोळगड हे नवनगर, दापोलीतील 7 गावांचे मिळून देवके हे नवनगर, गुहागरमधील दोडावण या नवनगरासाठी 6 गावे तर नवीन गणपतीपुळे या नवनगरासाठी 7 गावे निवडण्यात आली आहेत. या नवीन नगरांचा विकास आराखडा तयार होईपर्यंत या गावातील बांधकाम व विकास पकियेची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचीच राहणार असल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर नवनगरांचे नकाशे नगररचना विभागाने तयार केले आहेत. हे नकाशे मान्यतेसाठी वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात आले आहेत़ वरिष्ठ कार्यालय या नकाशांना मान्यता देऊन नगर नियोजनासाठी नव्या परवानग्यांसाठी या नकाशांचा उपयोग करणार आहेत़ नगररचना विभागाच्या कायद्याचा अंमलही नकाशामध्ये दाखवण्यात आलेल्या क्षेत्रामध्ये होणार आह़े तेथील विकास नियमावली ग्रामीण क्षेत्रातील निकषांऐवजी नगर क्षेत्रातील निकषांवर आधारित असेल, असे अधिकाऱयांनी सांगितले.
नवानगरांमध्ये समाविष्ट असलेल्या गावांची यादी
नवीन गणपतीपुळे: नेवरे, भगवतीनगर, गणपतीपुळे, धामणसे, भंडारपुळे, निवेंडी, ओरी, तळेकरवाडी. दोडावण: मुसलोंडी, नववण, चिंद्रावले, वाघांबे, दोडवली. देवके: किन्हाळ, देवके, चंडीकानगर, बुरोंडी, तेलेश्वरनगर, शितलनगर, महामयनगर. आंबोळगड: भराडीन, वाडातिवरे, पनेरे, नाटे, आंबोळगड, धाऊलवल्ली, भाबळेवाडी, पोकळेवाडी, राजवाडी, दसुरेवाडी, साखरीनाटे, यशवंतगड, बंधावाडी.