महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

माओवाद्याची झारखंडमध्ये शरणागती

06:38 AM Feb 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / लाथेर  

Advertisement

झारखंड राज्याच्या लाथेर येथे एका कुप्रसिद्ध माओवाद्याने शरणागती पत्करली आहे. त्याच्या नावावर 10 लाख रुपयांचे इनाम लावण्यात आले होते. हा माओवादी झारखंड जनमुक्ती परिषदेचा स्वयंघोषित म्होरक्या असून त्याचे नाव मनोहर परहिया असे असल्याची माहिती देण्यात आली. त्याच्यासह आणखी एका माओवाद्यानेही स्वत:ला झारखंड पोलिसांच्या आधीन केले आहे. त्याचे नाव दीपककुमार भुईयान असे आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मनोहर परहिया याच्या नावावर अनेक गुन्हे असून भारतीय जनता पक्षाचे नेते जयवर्धन सिंग यांची हत्या केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. त्याला पकडून देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येईल, अशी घोषणा झारखंड सरकारने केली होती.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article