For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था

10:26 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था
Advertisement

पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्याची मागणी : खड्डा चुकविताना वाहनधारकांची कसरत

Advertisement

खानापूर : खानापूर शहरातील अनेक रस्ते सध्या खराब झाले आहेत. आता दोन महिन्यात पावसाळ्याला सुऊवात होणार आहे. काही रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करणे गरजेचे आहे. सध्या आचासंहिता लागू असल्याने तसेच येत्या दीड-दोन महिन्यात पावसाला सुरुवात होणार असल्याने काही महिने वाहतूक सुरळीत होण्यासाठी पासाळ्यापूर्वी निदान खड्डा तरी बुजवून तात्पुरती दुऊस्ती करावी, अशी मागणी शहरातील जनतेकडून केली जात आहे. शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण पाच वर्षापूर्वी झालेल्या महालक्ष्मी यात्रेवेळी माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या विशेष विकास निधीतून करण्यात आले होते. मात्र आता शहरातील राजा छत्रपती चौक ते महाजन खुट्ट, निंगापूर गल्ली, लक्ष्मीनगर, चिरमुरकर गल्ली, देसाई गल्ली, जुना मोटरस्टँड रोड यासह अनेक गल्ल्यांतील डांबरी रस्त्यावर खड्डे पडले असून यातून वाहन चालविणे कठीण बनले आहे. शहराचे प्रवेशद्वार असलेले स्टेशन रोड, राजा छत्रपती चौक ते महालक्ष्मी मंदिरपर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असल्याने या रस्त्यावरुन दुचाकीस्वारांना खड्डा चुकवत दुचाकी चालवावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावर कायम वाहतुकीची केंडी होत आहे. यासाठी या सर्व रस्त्यांचे पुन्हा नव्याने डांबरीकरण करणे गरजेचे आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर करून रस्ते बनविणे गरजेचे आहे. मात्र सध्या लोकसभेच्या निवडणुकीची आचासंहिता लागू झाली असल्याने आता कोणतीही विकासकामे होणार नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात शहरातील सर्व रस्ते उद्ध्वस्त होऊन रस्त्यावर ख•dयांचे साम्राज्य निर्माण होणार आहे. यासाठी पावसाळ्यापूर्वी निदान रस्त्यावरील खड्डा चांगल्याप्रकारे बुजवून तरी घ्यावेत, अशी मागणी केली जात आहे. जर खड्डे बुजवले नाहीतर त्यामध्ये पावसाळ्यात पाणी साचून खड्यांची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. याची दखल नगरपंचायतीने घेऊन या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत, यासाठी सदर रस्त्यावरील खड्डा तात्पुरत्या स्वऊपात बुजवून पावसाळ्यात होणारी अडचण दूर करावी, अशी शहरातील जनतेची मागणी आहे.

पावसाळ्यापूर्वी शहरातील गटारींची स्वच्छता करणे गरजेचे

Advertisement

तालुक्यात उष्णतेने उच्चांक गाठला असून शहरासह तालुक्यात सातत्याने तपमान वाढत आहे. लोक उष्म्याने हैराण झाले आहेत. अशातच शहरात डासांची वाढ मोठ्याप्रमाणात झाली आहे. विशेषत: सायंकाळी 5.30 ते 7 च्या दरम्यान डासांचा मोठ्याप्रमाणात उपद्रव असतो. सध्या वाढलेल्या उष्म्यामुळे रात्री लोक वाऱ्यासाठी खिडक्या उघड्या ठेवत आहेत. रात्रीही डासांचा उपद्रव वाढलेला आहे.   वाढत्या डांसाच्या उपद्रवामुळे रोगराई निर्माण होण्याची शक्यता असते. याकरिता नगरपंचायतीने डास निर्मूलन मोहीम हाती घेणे जऊरीचे आहे. पूर्वी यासाठी नगरपंचायतीच्यावतीने शहरात वेगवेळ्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात येत होती. यामुळे डासांवर नियंत्रण येत होते. त्याच फवारणीची पुन्हा एकदा सुऊवात करून नगरपंचायतीने डास निर्मूलनाचा प्रयत्न करावा, अशी शहरातील जनतेची मागणी आहे.

डासांचा प्रादुर्भाव वाढला

आता एप्रिल महिना सुरू असून पावसाळ्याच्या अगोदर शहरातील सर्व गटारी स्वच्छ करणे गरजेचे आहे. यासाठी नगरपालिकेने तातडीने येत्या काही दिवसात शहरातील संपूर्ण गटारी साफ करणे गरजेचे आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फॉगिंग मशिनने फवारणी करणे, गावागावात अद्यापही असलेली कचऱ्याची ठिकाणे स्वच्छ करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने डासांचा त्रास वाढत आहे. यासाठी नगरपंचायतीने शहरातील स्वच्छता मोहीम राबवणे गरजेचे आहे. निवडणुकीची धांदल सुरू झाली असल्याने नगरपंचायतीचे कर्मचारी व सफाई कर्मचारी निवडणुकीच्या कामाला जुंपले जाण्याची शक्यता आहे. पावसाळा तोंडावर आला असून निवडणुकीची धांदलही जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहणार आहे. त्यामुळे नगरपंचायतीने पावसाळ्यापूर्वी शहरातील पाण्याच्या निचऱ्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :

.