For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बॉम्बवर्षक विमानात वैमानिकांसाठी अनेक सुविधा

06:24 AM Jun 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
बॉम्बवर्षक विमानात वैमानिकांसाठी अनेक सुविधा
Advertisement

बी-2 बॉम्बरमध्ये टॉयलेट, मायक्रोवेव्ह, स्नॅक्सबॉक्स

Advertisement

अमेरिकेने इराणच्या आण्विक केंद्रांवर बी-2बॉम्बर्सद्वारे विध्वंसक बॉम्बवर्षाव केला होता.  बी-2 बॉम्बर्सनी अमेरिकेतून उड्डाण करत इराणमध्ये पोहोचत तेथील आण्विक केंद्रांना लक्ष्य केले होते. या बी-2 बॉम्बर्सनी जवळपास 37 तास सलग उड्डाण केले होते. मधल्या काळात या विमानांमध्ये आकाशातच इंधन भरण्यात आले होते. बी-2 बॉम्बर्सच्या वैमानिकांनी अमेरिकेतून इराणपर्यंत पोहोचणे आणि हल्ले करत परत येईपर्यंतचा 37 तासांचा प्रवास एका छोट्याशा कॉकपिटमध्ये कसा पूर्ण केला या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे.

बी-2 स्टील्थ बॉम्बरमध्ये शौचालय, मायक्रोवेव आणि स्नॅक्स कूलर असते. यामुळे मिसौरीहून इराणपर्यंत जात हल्ला करणे आणि परत येण्यापर्यंतच्या 37 तासांच्या प्रवासादरम्यान वैमानिकांना कुठलाही त्रास झाला नाही. बी-2 बॉम्बर मुख्यत्वे सोव्हियत महासंघावर बॉम्ब पाडविण्यासाठी डिझाइन करण्यात आले होते.

Advertisement

सलग 37 तास कॉकपिटमध्ये

अत्याधुनिक बी-2 बॉम्बर्सचा ताफा शुक्रवारी कॅनसस सिटीच्या बाहेरील व्हाइटमॅन एअरफोर्स बेसवरून रवाना झाला होता. या विमानांमध्ये आकाशात अनेकदा इंधन भरण्यात आले होते. दीर्घ प्रवास सहनीय करण्यासाठी अत्याधुनि बॉम्बर विमानांच्या कॉकपिटमध्ये मिनी रेफ्रिजरेटर आणि मायक्रोवेव्ह ओव्हन लावलेले असतात, जेणेकरून चालक दलाला भोजन अन् रिफ्रेशमेंट मिळत राहिल.

अमेरिकेकडे 19 बी-2 बॉम्बर्स

दीर्घ अंतराच्या उड्डाणांसाठी सुसज्ज कुठल्याही विमानाप्रमाणे बी-2 स्पिरिटमध्येही शौचालय आहे. एक वैमानिक झोपू शकेल इतकी पुरेशी जागा देखील आहे. तर दुसरा वैमानिक त्यावेळी उ•ाण करू शकतो. बी-2ने पहिल्यांदा 1997 मध्ये उ•ाण केले होते. बी-2 च्या प्रत्येक विमानाची किंमत 2 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे. 2008 मध्ये एका दुर्घटनेत यातील एक विमान नष्ट झाले होते. अमेरिकेकडे आता या प्रकारातील 19 विमाने ओत. 172 फुटांचा पंखांचा फैलाव आणि केवळ दोन वैमानिकांच्या चालक दलासोबत बी-2 बॉम्बर दीर्घ अंतराच्या उड्डाणांना पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी ऑटो पायलटचाही वापर करते.

Advertisement
Tags :

.