बेसमेंटच्या कामाचा अनेकांना फटका
वार्ताहर/मजगाव
एलअॅण्डटीच्या दुर्लक्षामुळे मजगाव परिसरात पाण्यासाठी नागरिकांना मोठे कष्ट सहन करावे लागत आहेत. उद्यमबाग, बेम्को क्रॉस येथे सुरू असलेल्या बेसमेंटच्या कामाचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दीड महिन्यांपासून या परिसरातील पाणीपुरवठा बंद झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. उद्यमबाग, ब्रम्हनगर, देवेंद्रनगर, हनुमानवाडी, कलमेश्वरनगर, सागर कॉलनी, गजानननगर, महावीरनगर, संगोळ्ळी रायण्णा नगरसह उपकॉलनीमध्येही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. संबंधित कंपनीने तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अन्यथा घागर मोर्चा
कांही टँकर्स विहिरींचे पाणी भरून पिण्यासाठी पुरवठा सुरू आसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. संभाव्य धोका ओळखून आरोग्य खात्याने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अन्यथा महानगरपालिकेवर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा येथील महिला वर्गाने संतापाने दिला आहे.