महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरची हॅट्ट्रिक हुकली

06:59 AM Aug 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

25 मी एअर पिस्तूल प्रकारात मिळाले चौथे स्थान : थोडक्यात पदकाला हुलकावणी : कोरियाला गोल्ड तर फ्रान्सला रौप्य

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

वाढत्या उष्णतेची तमा न बाळगता भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केली. तिने तिसरे पदक मिळवण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न केला पण यात तिला यश आले नाही. शनिवारी मनू भाकर 25 मीटर प्रकारात आणखी एक पदक घेऊन येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पॅरिस ऑलिम्पिकमधील मनू भाकरचा प्रवास संपला. या स्पर्धेत तिने ऐतिहासिक रित्या दोन पदके जिंकली.

शुक्रवारी 25 मी पिस्तुलच्या पात्रता फेरीत भाकरने 590 गुण मिळवले (प्रिसीशनमध्ये 294 आणि रॅपिडमध्ये 296) आणि दुसरे स्थान पटकावात अंतिम फेरी गाठली. शनिवारी या फेरीचा अंतिम सामना झाला. मनूने अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी केली, पण एक चूक तिला महागात पडली. शूट ऑफ टायब्रेकरनंतर चौथ्या स्थानावर राहिल्यानंतर मनूला एलिमिनेशनचा सामना करावा लागला. या फेरीत मनूला 5 शॉट्स घ्यावे लागले. यापैकी केवळ तिला 3 शॉट मारता आले आणि तिचा स्कोअर 10.2 होता. तर, चौथ्या स्थानावर असलेल्या वेरोनिकाने लक्ष्यावर 4 शॉट्स मारले. यामुळे मनूचे स्वप्न भंगले आणि तिला अवघा एक शॉट चुकल्याने तिसरे पदक जिंकता आले नाही. तरीही 22 वर्षीय तरुणीने अद्वितीय कामगिरी केली आणि आता ती पॅरिस ऑलिम्पिकमधून दोन पदकांसह मायदेशी परतणार आहे. दक्षिण कोरियाच्या यांग जिओनने सुवर्ण, फ्रान्सच्या कॅमेलिने रौप्य तर हंगेरीच्या वेरोनिकाने कांस्यपदक पटकावले.

ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी

मनू जरी 25 मीटर पिस्तुल प्रकारात पदक जिंकू शकली नसली तरी तिने एका ऑलिम्पिकमध्ये अनेक ऐतिहासिक कामगिरी केल्या आहेत. मनू ही पहिली महिला भारतीय ठरली जिने शूटिंगमध्ये भारताला पदक जिंकवून दिले. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिलीच भारतीय ठरली. मनू भाकेरने या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत 2 पदके जिंकली आहेत. मनूने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले. यानंतर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत मनूसोबत सरबजोत सिंगचाही समावेश होता.

टोकियोचा वचपा पॅरिसमध्ये

मनू भाकरचे ही दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा आहे. यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमधून तिने पदार्पण केले होते तेव्हा तिथून तिला रिकाम्या हाताने परतावे लागले होते. टोकियोमध्ये मनूच्या अपयशाचे कारण पिस्तुलमधील तांत्रिक बिघाड हे होते. टोकियोमधील अपयशानंतर मनूला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये या साऱ्याची कसर भरुन काढत तिने ऐतिहासिक अशी कामगिरी साकारली. स्वत:सोबतच तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदकाचे खातेही उघडले आहे. याशिवाय, पिस्तुलमध्ये मिश्र सांघिक स्पर्धेत तिने कांस्य पटकावले.

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे नेमबाज

  1. राजवर्धन सिंग राठोड, रौप्य पदक, अथेन्स (2004)
  2. अभिनव बिंद्रा, सुवर्ण पदक, बीजिंग ऑलिम्पिक (2008)
  3. गगन नारंग, कांस्य पदक, लंडन ऑलिम्पिक (2012)
  4. विजय कुमार, रौप्य पदक, लंडन ऑलिम्पिक (2012)
  5. मनू भाकर, कांस्य पदक, पॅरिस ऑलिम्पिक (2024)
  6. मनु भाकर, सरबज्योत सिंग, कांस्य पदक, पॅरिस ऑलिम्पिक (2024)
  7. स्वप्नील कुसाळे, कांस्य पदक, पॅरिस ऑलिम्पिक (2024)

 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळाली याचा फार आनंद आहे. शनिवारी 25 मी पिस्तूल प्रकारात मी चौथ्या स्थानी राहिल्याने थोडी निराश झाली आहे. आता पुढीलवेळी आणखी जोमात पुनरागमन करेन. याशिवाय, आपल्यासोबत काम करणाऱ्या प्रशिक्षक जसपाल राणा, क्रीडा मंत्रालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मित्र परिवाराचे आभार मानले.

मनू भाकर, ऑलिम्पिक पदकविजेती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article