For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनू भाकरचे आजोळी जोरदार स्वागत

06:38 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनू भाकरचे आजोळी जोरदार स्वागत
Advertisement

वृत्तसंस्था/ झज्जर (हरियाणा)

Advertisement

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत दुहेरी पदक मिळविणारी नेमबाज मनू भाकरचे तिच्या आजोळी जोरदार स्वागत करण्यात आले. मनू भाकरचे आजोळ खानपूर खुर्द येथे आहे. या ठिकाणी तिचे आजोबा आणि आजी वास्तव्य करत असतात. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी प्रकारात भारताला दोन कांस्यपदके मिळवून देणाऱ्या मनूचा आम्हला सार्थ अभिमान वाटत आहे. खानपूर खुर्द परिसरातील अनेक व्यक्तींनी मनूचा गौरव करुन तिचा सत्कार केला. या लहानशा गावातील प्रत्येक व्यक्तीने दिलेल्या सहकार्यामुळे मनूला हे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया मनूचे वडील रामकिशन भाकर यांनी व्यक्त केली.

Advertisement
Advertisement
Tags :

.