For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सचिन तेंडुलकरच्या भेटीने हरखली मनू भाकर

06:00 AM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
सचिन तेंडुलकरच्या भेटीने हरखली मनू भाकर
Advertisement

‘ट्विट’मधून व्यक्त केल्या भावना, भेटीच्या क्षणाला गणले ‘आशीर्वाद’, अविस्मरणीय आठवणीबद्दल मानले आभार

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

आपली अपवादात्मक प्रतिभा आणि निर्धाराच्या जोरावर नेमबाजीच्या जगात छाप उमटविलेली भारतीय नेमबाज मनू भाकरला अलीकडेच दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला भेटण्याची संधी मिळाली आणि हा क्षण तिला हरखून सोडल्याशिवाय राहिला नाही. भाकरने तिचा उत्साह शेअर करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत एक मनापासून ट्विट पोस्ट केले आहे. तेंडुलकरचे तिला असलेले कौतुक आणि तिच्या मनात असलेले स्थान त्यातून दिसते. मनू भाकरने आपल्या ट्विटमध्ये सचिन तेंडुलकरने भेटण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Advertisement

‘एकमेवाद्वितीय सचिन तेंडुलकर सर ! क्रिकेटमधील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तीसोबतचा हा खास क्षण शेअर करताना धन्य वाटते. त्याच्या प्रवासाने मला आणि आमच्यापैकी अनेकांना आमची स्वप्ने पूर्ण करण्यास प्रवृत्त केले. अविस्मरणीय आठवणींसाठी धन्यवाद सर!’, असे मनूने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मनूने या क्षणाचे आशीर्वाद म्हणून वर्णन केले आहे. बऱ्याच काळापासून आपण ज्याचे कौतुक केलेले आहे आणि जी आपली आवडती व्यक्ती राहिलेली आहे त्याच्यासोबतचा हा अनुभव आपल्यासाठी किती खास आहे यावरही तिने जोर दिला आहे.

मनूच्या पोस्टला दिलेल्या उत्तरात सचिनने म्हटले आहे की, ‘मनू, तुझी आणि तुझ्या कुटुंबाची भेट खरोखरच खास होती. तुझी यशोगाथा सर्वत्र तऊण मुलींना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि नवनवीन टप्पे पार करण्यासाठी प्रयत्नशील राह-भारताचा तुला पाठिंबा आहे’.

सचिन तेंडुलकर हा सर्वकालीन महान क्रिकेटपटूंपैकी एक असून मैदानावरील त्याचे समर्पण, नम्रता आणि अतुलनीय कौशल्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. लहान वयातच उल्लेखनीय यश मिळविलेल्या मनू भाकरनेही एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बनून इतिहास रचला आहे. मनू भाकरने महिलांच्या वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत तिसरे स्थान मिळवून ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदकांचे खाते खुले केले होते. ती भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली महिला नेमबाज ठरली. त्यानंतर सरबज्योत सिंग आणि भाकर यांनी 10 मीटर एअर पिस्तूल (मिश्र सांघिक) स्पर्धेत कांस्यपदक जिंकले, जे भारताचे नेमबाजीतील पहिले सांघिक पदक होते.

Advertisement
Tags :

.