मनोज शामलनच्या मुलीचा चित्रपट येतोय
वॉचर या भयपटाचे दिग्दर्शन
‘द वॉचर्स’ या हॉलिवूड भयपटाचे दिग्दर्शन इशाना नाइट शामलन हिने केले असून तिनेच दिग्दर्शनाची जबाबदारी पेली आहे. इशाना भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक इम. नाइट शामलन यांची मुलगी आहे. द वॉचर्स या चित्रपटचा ट्रेलर सादर करण्यात आला असून तो अत्यंत आकर्षक असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून उमटत आहे. द वॉचर्स हा चित्रपट जुन महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट भयकथालेखक ए.एम. शाइन यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटाची निर्मिती एम. नाइट शामलन, अश्विन राजन आणि निमित मंकड यांनी केली आहे. जो होमवुड आणि स्टीफन डेम्बिट्जर चित्रपटचे कार्यकारी निर्माते आहेत. द वॉचर्स हा चित्रपट 5 जून रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात डकोटा फॅनिंग, जॉर्जिना कॅम्पबेल, ओलिवर फिन्नेगन यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. इशाना नाइट शामलन ‘द वॉचर्स’द्वारे दिग्दर्शनाच्या जगतात पाऊल ठेवणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर थरकाप उडविणारा आहे. डकोटा फॅनिंग आयरिश जंगलात हरवली असून यादरम्यान ती अनोळखींदरम्यान अडकल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे.