For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘किलर सूप’मध्ये मनोज अन् कोंकणा

07:00 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘किलर सूप’मध्ये मनोज अन् कोंकणा
Advertisement

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार थ्रिलर सीरिज

Advertisement

नेटफ्लिक्स इंडियाने किलर कास्टसोबत एका नव्या क्राइम थ्रिलर ‘किलर सूप’ची घोषणा केली आहे. मनोज वाजपेयी आणि कोंकणा सेन शर्मा यांची मुख्य भूमिका असलेली ही सीरिज एका ‘वृत्ता’वर आधारित आहे. नासिर, सयाजी शिंदे आणि लाल यांच्यासमवेत अनेक कलाकार यात दिसून येणार आहेत. अभिषेक चौबे यांच्याकडून याचे दिग्दर्शन करण्यात आले आहे. तर हनी त्रेहान आणि चेतना कौशिक यांच्याकडून निर्मित ही सीरिज 11 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचे पहिले पोस्टर शेअर करण्यात आले आहे. कहाणी इतकी विचित्र आहे की यावर विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला ही सीरिज पहावी लागेल असे याच्या पॅप्शनदाखल नमूद करण्यात आले आहे. सीरिजमध्ये कोंकणा सेन शर्माने स्वाती शेट्टी ही भूमिका साकारली असून ती एक महत्त्वाकांक्षी आणि प्रतिभावंत शेफ आहे, जी स्वत:चा पती प्रभाकरच्या जागी प्रियकर उमेशला आणण्यासाठी एक घातक योजना तयार करते, परंतु यात एक स्थानिक पोलीस निरीक्षक आणि खलनायकांची एंट्री होताच कहाणीला नवे वळण मिळते. सीरिजमध्ये प्रभाकरची भूमिका मनोज वाजपेयीने साकारली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.