मोपा विमानतळाची उंच ‘भरारी’
2 वर्षे 4 महिन्यांत 1 कोटी प्रवाशांचे आगमन : 7 देशांतर्गत, 5 आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांची सेवा
पणजी : ‘जीएमआर एअरपोर्ट्स लिमिटेड’ची उपकंपनी ‘जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड’द्वारे (जीजीआयएएल) विकसित करण्यात आलेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाने (मोपा) 2 वर्षे आणि 4 महिन्यांत 1 कोटी प्रवाशांचे आगमन हाताळले आहे. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या एकूण 7 देशांतर्गत विमान कंपन्या आणि 5 आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या चालवतो. ज्या जगभरातील 19 हून अधिक देशांतर्गत आणि 6 आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांना थेट उड्डाणे देतात. याशिवाय मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरूला दैनंदिन हब सेवा देत असल्याने जगभरातील शेकडो गंतव्यस्थानांना जोडले जात आहे. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जीओएक्सवरून चालणाऱ्या विमान कंपन्यांच्या प्रवाशांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. प्रवासी आणि विमान भागीदारांसाठी एक पसंतीचे विमानतळ म्हणून मोपा विमानतळाकडे पाहिले जात आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, अत्याधुनिक प्रवासी टर्मिनल इमारत आणि खरेदी, जेवण आणि आराम करण्यासाठी अनेक मार्गांसह, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वोच्च ठरत आलेले आहे.