खानापूर तहसीलदारपदी मंजुळा नायक यांची नेमणूक
पदभार स्वीकारला, न्यायालयाच्या आदेशानुसार कोमार यांची बदली
खानापूर : खानापूर तालुक्याचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खानापूर येथून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी तहसीलदार म्हणून मंजुळा के.नायक यांची नेमणूक करण्यात आली असून मंजुळा नायक यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा खानापूर तहसीलदारपदाचा पदभार स्वीकारला. तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात शेती उतारातील फेरफार प्रकरणी दावा उच्च न्यायालयात दाखल केला होता. उच्च न्यायालयाने तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांची 10 नोव्हेंबरपर्यंत बदलीचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्याने तात्काळ कारवाई करत कोमार यांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्यांच्या जागी मंजुळा के. नायक यांची खानापूर तहसीलदार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.