महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मनीष वर्मा यांची संजद महासचिवपदी नियुक्ती

07:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /पाटणा

Advertisement

संयुक्त जनता दलात सामील झाल्याच्या दोन दिवसांनी माजी आयएएस अधिकारी मनीष वर्मा यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष नितीश कुमार यांनी वर्मा यांची राष्ट्रीय महाचिवपदी नियुक्ती केली आहे. 9 जुलै रोजी संजदचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा आणि प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह यांच्या उपस्थितीत मनीष वर्मा यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले होते.

Advertisement

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारला अंधकारातून बाहेर काढत प्रकाशमान केले आहे. नितीश कुमार हे सदैव बिहार व येथील लोकांच्या विकासाबद्दल विचार करत असतात. संजदमध्येच खरा समाजवाद जिवंत आहे. उर्वरित पक्षांमध्ये घराणेशाहीच वरचढ ठरली असल्याचे मनीष वर्मा यांनी म्हटले. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मनीष वर्मा हे संजदमध्ये सामील झाल्याने आणि त्यांना महासचिव पद मिळाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मनीष वर्मा हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सल्लागार राहिले आहेत. तसेच नितीश यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ते ओळखले जातात. वर्मा यांनी आयएएसमधून स्वेच्छानिवृत्ती घेत नितीश यांचे सल्लागारपद स्वीकारले होते. मनीष वर्मा हे ओडिशा कॅडरचे आयएएस राहिले आहेत. ओडिशात विविध पदांवर कार्यरत राहिल्यावर 2012 मध्ये ते प्रतिनियुक्तीवर 5 वर्षांसाठी बिहारमध्ये आले होते. यादरम्यान ते पाटणा आणि पूर्णियाचे जिल्हाधिकारी राहिले होते. काही दिवसांपूर्वी संजदमध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत. यात सर्वात मोठी जबाबदारी संजय झा यांना मिळाली आहे. झा हे संजदचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत. तर  मनीष वर्मा यांना पक्षात राष्ट्रीय महासचिव हे पद सोपविण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article