मणिपूरला फुटबॉलचे जेतेपद
06:19 AM Dec 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ अनंतपूर (आंध्र प्रदेश)
Advertisement
रविवारी येथे झालेल्या कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेचे जेतेपद मणिपूरने 12 व्यांदा पटकाविले आहे. ही स्पर्धा टीयर-1 दर्जाची असून अंतिम सामन्यात मणिपूरच्या कनिष्ठ मुलींच्या फुटबॉल संघाने बंगालचा 9-0 असा एकतर्फी पराभव केला.
या अंतिम सामन्यात मणिपूर संघातील सी. रेदीमादेवी आणि एल. निरा छानू यांनी शानदार हॅट्ट्रीक साधली. रेदीमादेवीने 8 व्या, 41 व्या आणि 65 व्या मिनिटाला तर निरा छानूने 29 व्या, 55 व्या आणि 59 व्या मिनिटाला गोल केले. मणिपूर संघातील वाय. थोकचॉमने 68 व्या आणि 76 व्या मिनिटाला असे 2 गोल तर पुष्पाराणी देवीने 75 व्या मिनिटाला 1 गोल केला. या स्पर्धेतील मणिपूरचे हे 12 वे अजिंक्यपद आहे. मणिपूरने यापूर्वी 2023-24 तसेच 2024-25 या कालावधीत ही स्पर्धा जिंकली आहे.
Advertisement
Advertisement