कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मणिपूर हिंसाचाराला दोन वर्षे पूर्ण

06:28 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्यात हाय अलर्ट : कडक सुरक्षा तैनात

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

Advertisement

मणिपूर हिंसाचाराला शनिवार 3 मे रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. यादरम्यान राज्यातील तणाव लक्षात घेता सुरक्षा दलांनी इंफाळ, चुराचंदपूर आणि कांगपोक्पी येथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. शनिवारी मणिपूरमध्ये जवळजवळ सर्व बाजारपेठा, दुकाने आणि शाळा-महाविद्यालये बंद होती. तसेच रस्त्यांवर शांतता दिसून आली. कुकी समुदायाच्या वतीने हा दिवस बंद म्हणून पाळण्यात आला.  तसेच मैतेई संघटनेच्या समन्वय समितीने मणिपूर इंटिग्रिटी लोकांना सर्व उपक्रम थांबवून आपल्या अधिवेशनात उपस्थित राहण्याचे आवाहन केले. कुकी स्टुडंट्स ऑर्गनायझेशन (केएसओ) आणि झोमी स्टुडंट्स फेडरेशन (झेडएसएफ) यांनीही कुकीबहुल भागात बंदची हाक दिली होती. गेल्या दोन वर्षात मणिपूरमध्ये हिंसाचारामुळे 250 हून अधिक मृत्यू झाले. तसेच आजही 50 हजार लोक विस्थापित आहेत. नोंदवलेल्या 6 हजार एफआयआरपैकी सुमारे 2,500 गुन्ह्यांवर कारवाई झाली नाही. गंभीर गुह्यांबद्दल सीबीआय किंवा राज्य सरकार कोणतीही माहिती देत नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article