For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मणिपूर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यावर हल्ला

07:40 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
मणिपूर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यावर हल्ला
Advertisement

दोन जवान जखमी : सतर्कतेमुळे जीवितहानी टळली

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

मणिपूरमधील कांगपोकपी जिह्यात सोमवारी संशयित अतिरेक्मयांनी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या अग्रिम सुरक्षा ताफ्यावर हल्ला केला. त्यात दोन जवान जखमी झाले आहेत. ताफ्यातील एका वाहनचालकाला उजव्या खांद्यावर गोळी लागली असून त्याला इंफाळ येथील ऊग्णालयात दाखल केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.  मुख्यमंत्र्यांचा सुरक्षा ताफा हिंसाचारग्रस्त जिरीबाम जिल्ह्याकडे जात असताना सुरक्षा दलांच्या वाहनांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिल्यामुळे हल्लेखोर फरार झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू असून हल्ल्यासाठी कुकी समाजाच्या लोकांना जबाबदार धरले जात आहे.

Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. राष्ट्रीय महामार्ग-53 जवळील कोटलाने गावात बराचवेळ संघर्ष सुरू होता. या हल्ल्यात किमान दोन जवान गोळी लागल्याने जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जिरीबाम जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून तणाव असून मुख्यमंत्री बिरेन सिंह या भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा करण्याच्या विचारात होते. या दौऱ्यापूर्वी त्यांच्या सुरक्षा ताफ्याकडून सुरक्षेची पाहणी केली जात असताना संशयित अतिरेक्मयांनी हल्ला चढवला. यापूर्वी शनिवारी जिरीबाममधील दोन पोलीस चौक्मया, वन विभागाचे कार्यालय आणि किमान 70 घरांना आग लावल्यामुळे हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता.

सुमारे वर्षभरापूर्वी मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार उसळला होता. 3 मे 2023 रोजी मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये संघर्ष सुरू झाला. मणिपूरच्या 3.5 दशलक्ष लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकसंख्या मैतेई समुदायाची असून ते प्रामुख्याने इम्फाळमध्ये आणि आसपास राहतात. तर कुकी आणि नागा जमाती डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात. कुकी समाजातील लोक प्रामुख्याने ख्रिस्ती आहेत. दोन्ही समाजातील संघर्षामुळे मणिपूरमध्ये वारंवार हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.

Advertisement
Tags :

.