महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अनगोळ, मजगाव शेतवडीत भातरोप लागवडीची धांदल

10:11 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/मजगाव

Advertisement

अनगोळ, मजगाव शेतवडीत भातरोपे लागवडीची धांदल सुरू आहे. कारण गेले पंधरा दिवस या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतवडीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सोमवारपासून पावसाचा जोर कमी झाल्याने रोप लावणे जोरात सुरू आहे. कामगारांचा तुटवडा भासत असल्याने 25 ते 30 कि.मी. अंतरावरील महिला मजूर अनगोळ-मजगावमध्ये रोज येवून काम करीत आहेत. मजूर महिलांना घेवून येणे आणि सायंकाळी परत पोहोचविणे म्हणजे शेतमालकाला परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावेळी पाऊस समाधानकारक पडल्याने भातरोप लावणे सोयीस्कर झाल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article