For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनिका बात्रा, मानव ठक्कर दुसऱ्या फेरीत,

06:21 AM May 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
मनिका बात्रा  मानव ठक्कर दुसऱ्या फेरीत
Advertisement

टेटे वर्ल्ड चॅम्पियनशिप : साथीयानसह अन्य सात खेळाडू पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था/ दोहा, कतार

भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बात्राने येथे सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप टेटे स्पर्धेची एकेरीत दुसरी फेरी गाठली तर मानव ठक्करनेही पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली. भारतासाठी हा दिवस संमिश्र ठरला. जी. साथीयानसह अन्य सात भारतीय खेळाडूंना पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

Advertisement

22 व्या मानांकित मनिका बात्राने नायजेरियाच्या फातिमा बेलोवर 4-0 (11-5, 11-6, 11-8, 11-2) असा एकतर्फी विजय मिळविला. केवळ 40 मिनिटांत तिने हा सामना संपवला. तिची पुढील लढत कोरियाच्या पार्क गेह्योऑनशी होईल. भारताचा अव्वल मानांकित खेळाडू मानव ठक्करनेही शानदार सुरुवात करताना न्यूझीलंडच्या तिमोथी चोईचा 4-1 (11-3, 11-8, 6-11, 11-7, 14-12) असा पराभव केला.

18 वर्षीय अंकुर भट्टाचारजीला मात्र पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडावे लागले. त्याला हाँगकाँगच्या लाम सियूकडून 1-4 (11-4, 7-11, 9-11, 10-12, 8-11) असा पराभव स्वीकारावा लागला. अनुभवी जी. साथीयानाही पहिल्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. त्याला फ्रान्सच्या थिबॉल्ट पोरेतने 4-0 (11-5, 11-6, 11-7, 11-6) असे हरविले.

मिश्र दुहेरीमध्ये नवव्या मानांकि मनुष शहा व दिया चितळे यांनी अल्जेरियाच्या मेहदी बोलूसा व मलिसा नसरी यांच्यावर 3-0 (11-2, 11-7, 11-6) अशी मात केली. मात्र पुरुष दुहेरीत हरमीत देसाई व जी. साथीयान यांना पहिल्या फेरीत ऑस्ट्रियाचा मासीज कोलोझीसेक व मॉल्डोव्हाचा व्लाडिस्लाव्ह उर्सू यांच्याकडून 1-3 (9-11, 12-10, 14-16, 10-12) असा पराभव पत्करावा लागला.

मिश्र दुहेरीतही हरमीत देसाईला पराभवाला सामोरे जावे लागले. यशस्विनी घोरपडेसमवेत खेळताना या 14 व्या मानांकित जोडीने 2-0 अशी आघाडी घेतली होती. याशिवाय त्यांनी तीन मॅचपॉईंट्सही वाया घालविल्याने त्यांना फ्रान्सच्या थिबॉल्ट पोरेत व लियाना होशार्ट यांच्याकडून 2-3 (11-8, 11-6, 10-12, 8-11, 10-12) अशी हार पत्करावी लागली.

Advertisement

.