For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकाच झाडाला आंबा अन् कडुलिंब

06:45 AM Mar 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
एकाच झाडाला आंबा अन् कडुलिंब
Advertisement

निसर्ग हा चमत्कारांचा साठा आहे. आपण कल्पनाही करु शकणार नाही, अशी आश्चर्ये निसर्गात घडत असतात. सर्वसाधारणपणे आपली समजूत अशी असते, की विशिष्ट प्रकारच्या मुळापासून त्या प्रकारचेच झाड निर्माण होते. बहुतेकवेळा आपली ही समजूत योग्यही असते. पण झारखंड राज्याच्या पलामू येथे निसर्गनियमांच्याही विपरीत असा एक नैसर्गिक चमत्कार घडला आहे. अनेकांचा यावर विश्वास बसत नाही. पण ही बाब खरी आहे. या स्थानी एकाच मुळापासून कडूलिंब आणि आंबा लागणारे एक झाड उगवले आहे. हे आश्चर्य पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.

Advertisement

पलामू येथून जवळ असणाऱ्या बनखेता गावात हे झाड आहे. ग्रामस्थांच्या मते ते कैक दशकांपासून तेथे आहे. या झाडाच्या एका फांदीला गोड आंबे लागतात, तर दुसऱ्या फांदीला कडुलिंबाची फळे लागतात. 1980 मध्ये एकदा या झाडांवर, तसेच आजूबाजूच्या काही झाडांवर वीज पडली. तरीही या झाडाची काही हानी झाली नाही. आजही या झाडाला ही दोन्ही परस्परविरोधी गुणधर्म असणारी फळे लागतात. विशेष म्हणजे या झाडाचा आंबा इतका गोड आहे, की आजूबाजूच्या कोणत्याही झाडाला लागणारा आंबा इतका गोड नाही. त्यामुळे या झालाची ख्याती मोठ्या प्रमाणात झाली असून हे झाड पाहण्याची उत्सुकता अनेकांना असते.

शुभम पांडे हे या झाडाचे धनी आहेत. त्यांच्या पूर्वजांनी हे झाड लावले असल्याने ते या झाडाची चांगली निगा राखतात. त्यांनी या झाडात कोणताही हस्तक्षेप करण्याचे टाळले आहे. आंबे लागणाऱ्या फांद्या आणि कडुलिंब लागणाऱ्या फांद्या वेगळ्या करण्याचा त्यांनी मुळीच प्रयत्न केलेला नाही. हे झाड जसे आहे, तसे ते राखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या झाडामुळे आसपासच्या कोणत्याही झाडाला कोणताही त्रास झालेला नाही. वनस्पती तज्ञही या झाडासंबंधी आश्चर्य व्यक्त करतात. असे क्वचितच घडते, असे या तज्ञांचे मत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.