Solapur : मंगळवेढा पोलिसांनी फिरवला कर्कश सायलेन्सरवर बुलडोझर
सायलेन्सर मॉडीफाय करणाऱ्या मोटारसायकलस्वारांवर वाहतूक पोलिसांची कारवाई
मंगळवेढा : शहरात मोटारसायकलच्या पुंगळ्या काढून कर्कश आवाजाच्या सायलेन्सरविरुद्ध मंगळवेढा वाहतूक पोलिसांनी अशा गाडीवर कारवाई करून त्यांचे सायलेन्सवर बुलडोझर फिरवण्यात आला.
यावेळी डीवायएसपी डॉ. शिवपुजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगीड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा शहरात विशेष ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. त्यादरम्यान मोटारसायकलस्वारांविरुद्ध १५ दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापैकी १५ सायलेन्सर रोडवर ठेवून त्यावर बुलडोझर फिरवून नष्ट करण्यात आले. या कारवाईमध्ये मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पीएसआय विजय पिसे, नागेश बनकर तसेच वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार संभाजी यादव, पो. कॉ. साळुंखे, पो.कॉ काळेल व कर्मचारी सहभागी झाले होते.
यापुढेही पुंगळ्या काढून गाड्या फिरविणारे, सायलेन्सर मॉडीफाईड करून कर्ण कर्कश आवाज काढणारे तसेच फटाक्यांचा आवाज काढणारे मोटारसायकलरवारांवर लक्ष ठेवून ही कारवाई सुरूच राहणार आहे, असे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगीडे यांनी यावेळी सांगितले.