महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पारंपरिक पद्धतीने मंगाई यात्रा साजरी करणार

12:02 PM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बैठकीत वडगाव ग्रामस्थांचा सूर जिल्हाधिकाऱ्यांना देणार अहवाल

Advertisement

बेळगाव : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच वडगाव येथे होणाऱ्या मंगाई देवी यात्रेवेळी प्राणीहत्या बंदी करण्याबाबत आदेश बजावले होते. या संदर्भात गावकऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी सोमवारी प्रशासनाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ग्रामस्थांनी आपण पारंपरिक पध्दतीने यात्रोत्सव साजरा करु, अशी भूमिका मांडली. नागरिकांची ही भूमिका जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यानंतर एक संयुक्त बैठक घेवू, असे आश्वासन तहसीलदार बसवराज नागराळ यांनी दिले. उचगाव येथील मळेकरणी यात्रेच्या पाठोपाठ वडगाव येथे होणाऱ्या मंगाई यात्रे दरम्यान पशुहत्या बंदी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने आदेश बजावला आहे.

Advertisement

कोणत्याही मुक्या जनावरांना इजा न पोहोचविता यात्रोत्सव साजरा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या होत्या. याबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी सोमवारी कारभार गल्ली येथील नरवीर तानाजी व्यायाम शाळेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला परिसरातील आजी-माजी प्रतिनिधी तसेच हक्कदार व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी तहसीलदार बसवराज नागराळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेल्या नियमावलीची माहिती दिली. परंतु ही नियमावली कन्नड भाषेत असल्याने माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी आक्षेप घेत या नियमावलीचे मराठीत भाषांतर करण्याच्या सूचना केल्या.

मंगाई यात्रा ही वर्षातून केवळ एक दिवस साजरी होते. नागरिक आपापल्या परीने शाकाहारी तसेच मांसाहारी यात्रा करतात. त्यामुळे पारंपरिक पध्दतीने यात्रोत्सव साजरा करण्याबाबत ग्रामस्थांनी ठाम भूमिका मांडली. एकीकडे हिंदू सण उत्सवावंवर बंदी आणली असताना इतर धर्मियांच्या सणांवर निर्बंध का घातले गेले नाहीत, असा सवाल विचारण्यात आला. तसेच आधी आदेश बजावून नंतर बैठक बोलविण्यात काय अर्थ आहे, असा उलट प्रश्न करताच अधिकारीही अनुत्तरीत झाले. नागरिकांची मते जाणून घेतल्यानंतर आपण हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे देवू व त्यानंतर पुन्हा एक संयुक्त बैठक घेऊ, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ, नगरसेवक मंगेश पवार, संतोष टोपगी, विनायक पाटील, देवीदास पाटील, अनंत पाटील, योगेश पाटील, युवराज पाटील यासह मंगाई देवस्थानचे हक्कदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article