For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : मणेराजुरीत हॉटेलवर छापा, वेश्या व्यवसाय उघडकीस

06:10 PM Nov 26, 2025 IST | NEETA POTDAR
sangli news   मणेराजुरीत हॉटेलवर छापा  वेश्या व्यवसाय उघडकीस
Advertisement

                                              डॉल्फीनमध्ये जबरदस्तीने वेश्या व्यवसाय

Advertisement

तासगाव : तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील हॉटेल डॉल्फीन हॉटेलवरील वेश्या व्यवसाय उघडकीस. पोलिसांनी या हॉटेलवर छापा टाकून हॉटेल मालक, मॅनेजर, तसेच दोन ग्राहक अशा चौघांना ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी दिली. तर तासगांव परिसरात ही असाच प्रकार काही हॉटेल, लॉजवर सुरू असून तासगांवात कधी कारवाई होणार असा सवाल उपस्थित होत आहे.

याप्रकरणी पो.हे.कॉ. सुरेश गणपत भोसले यांनी हॉटेल मालक कैलासबाबासो सुर्यवंशी - २७ रा. जाधववाडी, ता. कवठेमहांकाळ, मॅनेजर सागर पोपट भोसले २३ रा. मणेराजुरी, ता. तासगांव, ग्राहक सुनिल लालासो चव्हाण-३४ रा. मणेराजुरी ता. तासगांव, ओंकार गणेश सकटे-२६ रा. डोली ता. जत यांच्या विरूध्द फिर्याद दिली आहे. या सर्वांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तर दोन पिडीत महिलांना ताब्यात घेणेत आले.

Advertisement

ही कारवाई पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधिक्षक आरती बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड, पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक दिपक पाटील यांच्यासह पो. हे. कॉ. सुरेश भोसले,अमर सुर्यवंशी, अमित परीट, पो.शि. सतिश साठे, तानाजी शिंदे, अजित सुर्यवंशी, म.पो. शि.गिताजंली पाटील, आरती खोत या पोलीस पथकाने केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की.पो.नि. संग्राम शेवाळे यांनी एक पथक तयार करून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करणेस भाग पाडणारे व्यक्तींची माहिती काढून कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते. दरम्यान २४ नोव्हेंबर रोजी पोलीस हवालदार सुरेश भोसले यांना गोपनिय बातमी मिळाली की, डॉल्फीन हॉटेल कोड्याचे माळ, मणेराजुरी येथे सागर भासले याने जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करणेकरीता या ठिकाणी महिला आणून ठेवल्या आहेत. तसेच या हॉटेलमधील खोल्या वेश्या व्यवसायाकरीता भाड्याने देतो व स्वतःची उपजिवीका या व्यवसायावर करतो अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार
पो.नि.संग्राम शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि.दिपक पाटील यांच्यासह पोलीस पथकाने तेथे धाव घेऊन छापा टाकला.व हॉटेल मालक, मॅनेजर, तसेच दोन ग्राहक व दोन पिडीत महिलांना ताब्यात घेतले.

तासगांवात कारवाई कधी
तालुक्यातील ग्रामीण भागातील हॉटेलवर वेश्या चालत असल्याचा पर्दाफाश करण्यात तासगांव पोलीसांना यश आले आहे. जर ग्रामीण हे चित्र पाहवयास मिळत तासगांव शहरात काय असेल असा सवाल उपस्थित होत आहे. शहरासह परिसरात असणाऱ्या काही हॉटेल व लॉजिंगवरही असाच प्रकार जोमात सुरू आहे असे बोलले जात आहे. मात्र यावर अदयापपर्यंत कधीच कारवाई झालेली नाही, त्यामुळे तासगांवात कारवाई कधी असा ही सवाल उपस्थित होत आहे.

Advertisement
Tags :

.