For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खड्ड्यांत हरवले मंडोळी गाव

11:04 AM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
खड्ड्यांत हरवले मंडोळी गाव
Advertisement

गावच्या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य : वाहनधारकांतून संताप : दुऊस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Advertisement

वार्ताहर/किणये

मंडोळी गावच्या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सुमारे एक ते सव्वा फुटापर्यंत खड्डे पडले असल्यामुळे या रस्त्यावरून वाहनधारकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे वाहनधारक अक्षरश: वैतागून गेले आहेत. प्रशासनाचे रस्त्याच्या दुऊस्तीकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. सध्याची रस्त्याची परिस्थिती पाहता मंडोळी गावाला जाताय... जरा सावधान.. असे म्हणण्याची वेळ आली आहे.

Advertisement

मंडोळी गावातील मुख्य रस्ता तसेच सावगाव क्रॉसपर्यंत व हंगरगा रस्त्यावरील पुलापर्यंतचा रस्ता खड्डेमय बनला आहे. या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. गेल्या सात वर्षापासून या रस्त्याच्या दुऊस्तीकडे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असल्यामुळे आता आपण दाद मागायची कुणाकडे, असा सवाल वाहनधारक व स्थानिक नागरिक करू लागले आहेत. भवानीनगर ते मंडळी गावापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या दीड वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. मात्र गावच्या प्रारंभापासून ते सावगाव क्रॉस व हंगरगा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.

या रस्त्यावर खड्ड्यांमुळे रात्रीच्या वेळी अनेक दुचाकीस्वार पडून किरकोळ जखमी झालेले आहेत. तसेच चारचाकी वाहने व कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस जाणेही या रस्त्यावरून अवघड बनले आहे. मंडोळी, सावगाव, हंगरगा, खादरवाडी नावगे तसेच या परिसरातील अनेक गावातील वाहनधारकांची या रस्त्यावरून रोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. खादरवाडी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. तसेच प्राथमिक मराठी शाळेजवळील व हायस्कूलजवळील रस्ताही खराब झाला आहे. खादरवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली. त्यामुळे मंडोळी गावात येणाऱ्या नागरिकांचे खड्ड्यांच्या रस्त्यातून स्वागत होऊ लागले आहे.  सेच काही नवीन वाहनधारक या रस्त्यावरून येत असताना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकीस्वार पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्वरित रस्त्याची दुऊस्ती करावी

मंडोळी गावच्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. लोकप्रतिनिधींचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यासाठी प्रशासनाकडून निधी मंजूर होत नाही का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. या रस्त्यावरून राज्य परिवहन मंडळाच्या बस येतात. त्यांनाही वाहतूक करणे अवघड बनलेले आहे. तसेच विद्यार्थी शेतकरी वर्गाची वर्दळ असते. या खड्ड्यांमुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मंडोळी-सावगाव पुलाचे कामकाजही निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. खादरवाडी-मंडोळी रस्त्याची अवस्था बिकट बनली आहे. त्यामुळे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून त्वरित दुऊस्ती करावी.

 - सचिन दळवी , मंडोळी

Advertisement
Tags :

.