महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गोव्याचा मंदार राव देसाई चेन्नईन एफसीला करारबद्ध

12:30 PM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव : चेन्नईन एफसीने आगामी 2024-25 फुटबॉल हंगामासाठी गोव्याच्या मंदार राव देसाई याला करारबद्ध केले आहे. आयएसएल फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या काही यशस्वी खेळाडूंमध्ये मंदार राव देसाई याचेही नाव प्रामुख्याने घेण्यात येत आहे. आयएसएल 2021 विजेता मुंबई सिटी एफसी संघात मंदार होता तसेच 2020 मध्ये एफसी गोवा तर 2021 व 2023 मध्ये मुंबई सिटी एफसी शील्ड विजेत्या संघात तो होता. 32 वर्षीय मंदार हा आता चेन्नईन एफसीसाठी करार करणारा सातवा फुटबॉलपटू आहे. एफसी गोवा तसेच मुंबई सिटी एफसीचे कप्तानपद भुषविलेला मंदार राव देसाई आता रायन एडवर्डस, इल्सन जोस डायस ज्युनियर व पी. सी. लालदिनपुईया या डिफेंडर्ससमवेत बचावफळीत खेळणार आहे.

Advertisement

‘मंदार हा अनुभवी फुटबॉलपटू असून त्यांच्या समावेशाने आमची बचावफळी मजबूत होणार आहे. भारतीय फुटबॉलची मला आता जास्त ओळख असून मंदार सर्वांत जास्त आयएसएल फुटबॉल स्पर्धेत खेळलेला खेळाडू आहे’ असे चेन्नईन एफसीचे प्रशिक्षक ओवन कोएल म्हणाले. मंदारने आपल्या प्रोफेशनल फुटबॉलची सुरूवात 2013 मध्ये आय-लीग स्पर्धेत धेंपो स्पोर्ट्स क्लबकडून खेळून केली. त्यानंतर तो एफसी गोवाला करारबद्ध झाला. यानंतर तो आयएसएलमध्ये एकूण 155 सामने खेळला व यात 14 प्ले-ऑफ लढतींचा समावेश होता. स्पर्धेत त्याने 6 गोल पेले असून गोल करण्यासाठी बारा वेळा असिस्टही केले आहे. 2020 मध्ये मंदार हा आयएसएलमध्ये 100 सामने खेळणारा पहिला फुटबॉलपटू ठरला. गेल्या मोसमात तो ईस्ट बंगालसाठी खेळला. एकूण 17 आयएसएल सामन्यांत तो 1195 मिनिटे फिल्डवर होता. भारतीय संघातही मंदारचा समावेश होता. 2021 मध्ये सॅफ विजेत्या भारतीय फुटबॉल संघातही मंदाराचा समावेश होता.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article