‘मंडाला मर्डर्स’
सीरिजमध्ये वाणी कपूर
रोमँटिक अन् अॅक्शन थ्रिलर चित्रपटांसाठी ओळखली जाणारी यशराज फिल्म्स आता ओटीटीवर क्राइम थ्रिलर घेऊन येणार आहे. यशराज फिल्म्सच्या सीरिजचे नाव मंडाला मर्डर्स असून हा एक क्राइम थ्रिलर ड्रामा आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मने आता सीरिजच्या फर्स्ट लुकसोबत कलाकार अन् प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.
मंडाला मर्डर्स या सीरिजमध्ये वाणी कपूर, सुरवीन चावला, श्रिया पिळगावकर, वैभव राज गुप्ता हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. पोस्टरवर वाणीचा हातात पिस्तुल घेतलेला लुक दिसून येतो. तर सुरवीन ही हात जोडून उभी असल्याचे पोस्टरवर दाखविण्यात आले आहे.
‘प्रत्येक वरदानात एक शाप लपलेला आहे. मोल फेडण्याची वेळ लवकरच येणार’ असे पोस्टरच्या कॅप्शनदाखल नमूद करण्यात आले आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर 25 जुलैपासून स्ट्रीम होणार आहे. एका शहरात हत्या होत असून त्यामागील रहस्य उलगडणाऱ्या अधिकाऱ्याची भूमिका वाणी साकारत आहे.