For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मँचेस्टर सिटीला प्रथमच क्लब विश्वचषक जेतेपद

06:53 AM Dec 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
मँचेस्टर सिटीला प्रथमच क्लब विश्वचषक जेतेपद
Advertisement

फ्लुमिनेन्सवर 4-0 ने सहज विजय, यंदाचे एकंदरित पाचवे जेतेपद

Advertisement

वृत्तसंस्था/ जेद्दा (सौदी अरेबिया)

मँचेस्टर सिटीने शुक्रवारी फ्लुमिनेन्सचा 4-0 असा सहज पराभव करून आपले पहिले क्लब विश्वचषक विजेतेपद पटकावताना यंदाचा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मिळून एकंदरित पाचवा चषक जिंकला. त्यांचे प्रशिक्षक पेप गार्डिओला आनंदाने मँचेस्टर सिटीला जगातील यंदाचा सर्वोत्कृष्ट संघ म्हणण्यास तयार आहेत. परंतु त्याला सर्वकालीन महान संघ म्हणता येईल का या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास मात्र काही दशके नसली, तरी काही वर्षे निश्चित वाट पाहावी लागेल.

Advertisement

तीन वेगवेगळ्या संघांसह फिफा क्लब स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारे गार्डिओला हे पहिले प्रशिक्षक आहेत आणि त्यांनी 2011 मध्ये स्पेन व युरोपचे तसेच जागतिक विजेते बनलेल्या बार्सिलोना संघाशी मँचेस्टर सिटीच्या स्थितीची तुलना केली आहे. जर लोक 25 किंवा 30 वर्षांनंतरही संघाबद्दल बोलत असतील, तर त्याचा अर्थ संघ खरोखरच चांगला आहे. हा दिवस छान आहे. आम्ही जगातील सर्वोत्तम संघ आहोत’, असे ते म्हणाले.

गार्डिओलांचा संघ यावर्षी युरोपमध्ये निर्विवादपणे सर्वोत्कृष्ट ठरला आहे आणि फ्लुमिनेन्ससाठी त्यांचे आव्हान खूप भारी ठरले. पहिल्यांदाच दक्षिण अमेरिकेचे विजेते बनलेल्या या संघाला 27 मिनिटांच्या आंत दोन गोलांनी पिछाडीवर पडावे लागले. ‘आम्ही (कोपा) लिबर्टाडोरेससाठी वर्षभर तयारी केली, पण क्लब विश्वचषकासाठी नाही, असे फ्लुमिनेन्सचे प्रशिक्षक फर्नांडो दिनीज यांनी सांगितले.

मँचेस्टर सिटीने अवघ्या 40 सेकंदांनी आघाडी घेत हा सामना आपल्यासाठी बहुतांशी तणावमुक्त केला. नॅथन अकेचा फटका गोलखांब्याला आदळून परत आल्यानंतर ज्युलियन अल्वारेझने त्वरित हालचाली करत गोल नोंदविला. फ्लुमिनेन्सचा कर्णधार निनोने केलेल्या स्वयंगोलाने सामन्याचे भविष्य काय राहील हे निश्चित केले. त्यानंतर 72 व्या मिनिटाला अल्वारेझच्या पासवर फिल फोडेनने चेंडू जाळ्यात सारला, तर अल्वारेझने 88 व्या मिनिटाला पुन्हा गोलाची नोंद केली.

फिफाच्या या महाखंडीय विजेत्यांसाठीच्या आतापर्यंत झालेल्या 17 स्पर्धांमध्ये युरोपला मिळालेले हे 16 वे विजेतेपद आहे. या सामन्यात मँचेस्टर सिटीचा मुख्य मिडफिल्डर रोड्रीला फ्लुमिनेन्सचा बदली खेळाडू अॅलेक्झांडरने पाडल्यानंतर त्याला मैदानावरून बाहेर जावे लागले. तसेच सामन्यानंतर मँचेस्टर सिटीचा कर्णधार काइल वॉकरची अनुभवी बचावपटू फेलिप मेलोसह फ्लुमिनेन्सच्या खेळाडूंशी बाचाबाची होण्याचा प्रसंगही घडला. रोड्रीने नंतर चषकासह जल्लोषात भाग घेतला आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कारही त्यालाच प्राप्त केला.

रोड्रीच्या शानदार फॉर्ममुळे मँचेस्टर सिटीने एर्लिंग हॅलँड आणि केविन डी ब्रुयन या दुखापत झालेल्या सुपरस्टार्सच्या अनुपस्थितीतही सौदी अरेबियामध्ये चार दिवसांत दुसरा विजय सहज मिळवला. मंगळवारी झालेला उरावा रेड डायमंड्सविऊद्धचा सिटीचा उपांत्य फेरीतील सामनाही त्यांना मुकला होता. दरम्यान, तीन वेगवेगळ्या संघांसह क्लब विश्वचषक जिंकण्यात यश मिळविणारे गार्डिओला हे पहिले प्रशिक्षक बनले आहेत. प्रशिक्षक म्हणून त्यांचे हे विक्रमी चौथे क्लब विश्वचषक विजेतेपद आहे. 2009 आणि 2011 मध्ये त्यांनी बार्सिलोनासहृ तर 2013 मध्ये बायर्न म्युनिकसह हे जेतेपद मिळविले.

जेद्दा येथे त्यापूर्वी झालेल्या तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात इजिप्तच्या आफ्रिकन विजेत्या अल अहलीने जपानचा आशियाई विजेता संघ उरावावर 4-2 असा विजय मिळवला.

Advertisement
Tags :

.