मँचेस्टर सिटीकडून अल ऐनचा 6-0 ने धुव्वा
वृत्तसंस्था/ अटलांटा
इल्के गुंडोगनने केलेले दोन गोल, एर्लिंग हालांदने पेनल्टीवर केलेला गोल यांच्याड जोरावर मँचेस्टर सिटीने अल ऐनला 6-0 असे हरवून क्लब वर्ल्ड कपच्या बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. निराशाजनक राहिलेल्या हंगामात ही उत्साहवर्धक कामगिरी करणाऱ्या सिटीसाठी क्लॉडिओ एचेव्हेरी, ऑस्कर बॉब आणि रायन चेरकी यांनीही गोल केले.
हा इंग्लिश संघ प्रीमियर लीगमध्ये सलग चार विजेतेपदांनंतर तिसऱ्या स्थानावर राहिला आणि यूएफा चॅम्पियन्स लीगच्या बाद फेरीत रिअल माद्रिदकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या गट सामन्यात मोरोक्कोच्या वायदादवर 2-0 असा विजय मिळवल्यानंतर पूर्णपणे नवीन संघासह खेळणाऱ्या मॅन सिटीने अटलांटामध्ये संयुक्त अरब अमिरातीतील एका आक्रमक क्लबवर वर्चस्व गाजवले. इंग्लंडच्या संघाकडे 74 टक्के इतका चेंडूचा ताबा राहिला आणि गोलवर फटके हाणण्याच्या बाबतीत त्यांनी अल ऐनला 21-5 असे मागे टाकले.
व्हिडिओ रिह्यूमध्ये असे आढळून आले की, कॉर्नर कीकच्या वेळी रमी राबियाने सिटीच्या मॅन्युएल अकांजीला खाली पाडले. त्यानंतर मिळालेल्या पेनल्टीवर हालांदने या मोसमातील 32 वा गोल केला. त्यानंतर चेरीने सामन्यातील शेवटच्या क्षणी आपल्या नव्या क्लबसाठी गोल केला. या अपेक्षित निकालामुळे मॅन सिटी आणि इटालियन क्लब युव्हेंटस गट ‘जी’ मधून 16 संघांच्या फेरीत पोहोचले आहेत. अल ऐनला दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. त्यांच्या पहिल्या सामन्यात युव्हेंटसकडून त्यांना 5-0 असा पराभव पत्करावा लागला.
मँचेस्टर सिटी हा विद्यमान क्लब विजेता आहे, ज्याने 2023 मध्ये पूर्वीच्या सात संघांच्या स्पर्धेत जेतेपद जिंकले होते. गुंडोगनने सुरुवातीलाच गोलकीपर खालिद ईसा याच्या डोक्यावरून चेंडू हाणून गोल केल्यानंतर एचेव्हरीने 27 व्या मिनिटाला गोल करून सिटीसाठी हा समना अगदीच सोपा ठरेल याची खात्री केली. मँचेस्टर सिटी गुऊवारी ऑर्लेंडोमध्ये युव्हेंटसचा सामना करेल आणि गटात कोणता संघ अव्वल स्थान मिळवेल हे त्यातून ठरवेल. त्यानंतर दोन्ही क्लबांसाठी खरी मोहीम सुरू होईल.