केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी मानसी गेंजीची निवड
06:23 AM Dec 04, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव :
Advertisement
केंद्रीय विद्युत अनुसंधान नवी दिल्ली संचालित ‘वीज वाचवा’ या राज्यस्तरीय भित्तीचित्र स्पर्धेमध्ये सेंटमेरीज हायस्कूलची इयत्ता 10 वीची विद्यार्थिनी मानसी परशराम गेंजी हिने तृतीय क्रमांक मिळविला. यामुळे नवी दिल्ली येथे होणाऱ्या केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी ती पात्र ठरली आहे. बेंगळूर येथे राज्यसभा सदस्य लहरसिंग यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. ही स्पर्धा दि. 11 डिसेंबर रोजी होणार आहे. बेंगळूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील एक लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये मानसीने तृतीय क्रमांक मिळविला. तिला प्रा. जास्मीन रुबडी, चित्रकला शिक्षक मोहन देमाने व प्रफुल्ल नाकाडी यांचे मार्गदर्शन लाभले.
Advertisement
Advertisement
Next Article