अखेर सरगुरु येथील नरभक्षक वाघ जेरबंद
10:58 AM Nov 10, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : सरगुरु तालुक्मयात वारंवार नागरिकांसह जनावरांवर हल्ला करून त्यांचा जीव घेणाऱ्या नर वाघाला जेरबंद करण्यात आले आहे, अशी माहिती वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी दिली. मागील 15 दिवसांत बंडिपूर आणि नागरहोळे अभयारण्यात वाघाच्या हल्ल्यात तीन शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. मृतांचे शवविच्छेदन अहवाल आणि वाघाचे डी. एन. ए. तपासून पकडलेला वाघ तोच आहे का?, याची पुष्टी करण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. बंडिपूर आणि नागरहोळेच्या जंगलाच्या सीमेवर वाघांकडून मानवांवर आणि पशुधनावर हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याची दखल घेत वनमंत्र्यांनी बंडिपूर आणि नागरहोळे अभयारण्यातील सफारी पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article