महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानबाबत घोषणा देणारा गजाआड

10:34 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चिकोडी : सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी मतमोजणी केंद्राबाहेर विजयी उमेदवाराचा विजयोत्सव साजरा करताना एका 25 वर्षे युवकाने पाकिस्तान की जय अशा घोषणा दिल्यामुळे चिकोडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. जमीर सिकंदर नाईकवाडी (वय 25 मातंग गल्ली, सध्या रा. झारी गल्ली चिकोडी) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर  99/ 2024 कलम 295/ए,  505/ 2 आयपीसी असे कलम लावण्यात आले आहेत. पोलिसांनी स्वत:हून त्याच्याबद्दल फिर्याद निर्माण नोंद केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिनकुमार दासरेड्डी यांनी चिकोडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

Advertisement

निवडणुकीचा निकाल जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांची चिकोडी येथील मतमोजणी केंद्र असलेल्या आरडी महाविद्यालयासमोर गर्दी झाली होती. यावेळी विजयी उमेदवारांची घोषणाबाजी करण्यात येत होती. मतमोजणी केंद्राच्या प्रवेशद्वारा जवळच हजारो कार्यकर्ते जमले होते. त्यातच आरोपी जमीर नाईकवाडी हा जल्लोष करीत होता. दरम्यान दुपारी 12 वाजता त्याने द्वेष भावनेतून पाकिस्तान की जय अशा घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानुसार चिकोडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दासरेडी यांनी त्याच्यावर गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article