महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पुढील आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर ममता बॅनर्जी

06:13 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सोरेन अटकेनंतर बदलले राजकीय वातावरण

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक झाल्यावर राष्ट्रीय राजकारणाचे चित्र बदलून गेले आहे. अशा स्थितीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी या लवकरच दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. या त्यांच्या अचानक ठरलेल्या दौऱ्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

ममता बॅनर्जी या सोमवारी दुपारी दिल्लीसाठी रवाना होतील. निवडणूक आयोगाच्या मंगळवारच्या बैठकीत सामील होण्यासाठी त्या दिल्लीत येणार असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात येत आहे. परंतु त्यांच्या दौऱ्याचा हा कार्यक्रम पूर्वनिर्धारित नव्हता. दिल्लीत अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय बैठकीत त्या भाग घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

याचबरोबर ममता बॅनर्जी या ‘एक देश, एक निवडणूक’ विषयक समितीच्या बैठकीत सामील होतील असेही मानले जात आहे. ही बैठक 6 किंवा 7 फेब्रुवारीला दिल्लीत पार पडणार आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील या समितीच्या बैठकीत ममता बॅनर्जी सामील होणार असल्याची चर्चा आहे.

काँग्रेससोबत आम्ही आघाडी करू इच्छित होतो. परंतु काँग्रेस आणि माकपने आघाडी केली आहे. माकप आणि भाजपसोबत आम्ही कदापिही आघाडी करणार नाही. मी बंगालच्या मातीची कन्या असून आम्ही स्वबळावर लढू असे ममता बॅनर्जी यांनी अलिकडेच म्हटले होते. जागावाटपावरून मतैक्य न झाल्याने ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस स्वबळावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. परंतु काँग्रेस नेतृत्वाकडून तृणमूलसोबत आघाडी व्हावी या दृष्टीने अद्याप प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article