मालविका बनसुद उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या सुपर 300 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची महिला बॅडमिंटूनपटू मालविका बनसुदने एकेरीची उपांत्यफेरी काढताना स्कॉटलंडच्या गिलमूरचा पराभव केला.
नागपूरच्या 22 वर्षीय मालविका बनसुदने स्कॉटलंडच्या ख्रिस्टी गिलमुरचा 10-21, 21-15, 21-10 अशा गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळांडुत स्थान मिळविले. 2014 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ख्रिस्टीने रौप्य पदक मिळविले होते. आतापर्यंत मालविकाला दोनवेळा ख्रिस्टीकडून हार पत्करावी लागली होती. मालविकाने चालु वर्षीच्या बॅडमिंटन हंगामात अझरबेजान आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. आता मालविकाचा उपांत्यफेरीचा सामना जपानच्या निदाराशी होणार आहे. पुरूष एकेरीमध्ये भारताच्या राजवतचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. चीनच्या ली झीने राजवतचा 15-21, 21-11, 21-18 असा पराभव केला.