मालवण - रत्नागिरी बंद एसटी अखेर सुरु
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा पुढाकार
आचरा प्रतिनिधी
मालवण आचरा मार्गे मालवण -रत्नागिरी एसटी बस सकाळी साडे आठ वाजता जाणारी एस टी बस फेरी कमी भारमान आणि अपुऱ्या कर्मचारी वर्गाच्या समस्येमुळे बंद करण्यात आली होती. त्यामुळे याभागातून रत्नागिरीला जाणारे प्रवासी , मुणगे - देवगड येथे शाळेला जाणारे विदयार्थी यांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत आचरा येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे लक्ष वेधताच त्यांनी मालवण आगार प्रमुख अनिरुद्ध सुर्यवंशी यांची भेट घेऊन गाडी सुरु करण्याची मागणी केली.यास महामंडळाकडून मान्यता देत सोमवार सकाळ पासून बंद गाडी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी दत्ता सामंत यांच्या सोबत आचरा सरपंच जेरान फर्नांडिस, शिवसेना नेते संतोष कोदे, शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश गावकर,जयप्रकाश परुळेकर, दिपक पाटकर, संतोष मिराशी,सचिन हडकर,अजित घाडी यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.