महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मालोजीराजे, मधुरिमाराजे होणार राजेश लाटकरांच्या प्रचारात सक्रीय

03:52 PM Nov 11, 2024 IST | Radhika Patil
Malojiraje, Madhurimaraje will be active in the campaign of Rajesh Latkar
Advertisement

न्यू पॅलेस येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात लाटकरांच्या विजयाचा निर्धार : सामान्य कार्यकर्त्याला आमदार करण्यासाठी एकजूटीने कामाला लागा : आमदार सतेज पाटील

Advertisement

कोल्हापूर : 
माजी आमदार मालोजीराजे आणि मधुरिमाराजे छत्रपती यांनी कोल्हापूर उत्तरचे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केले. लाटकर यांना मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धारही करण्यात आला. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थित होती.

Advertisement

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी मधुरिमाराजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यांच्या अचानक माघारीच्या निर्णयाने कोल्हापूरात खळबळ उडाली होती. मात्र त्यांनी माघार का घेतली याबाबतची भुमिका लवकरच जाहीर करणार असल्याचेही माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितले होते. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या माघारीमुळे महाविकास आघाडीने राजेश लाटकर यांची उमेदवारी पुरस्कृत केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मालोजीराजे छत्रपती यांच्या कार्यकर्त्यांचा रविवारी न्यू पॅलेस येथे मेळावा झाला.
माजी आमदार मालोजीराजे म्हणाले, सामान्य घरातल्या कार्यकर्त्याला संधी मिळावी, अशी भावना सुरवातीपासूनच खासदार शाहू महाराज यांची होती.

मात्र कार्यकर्त्यांचा आग्रहामूळ मधुरिमाराजे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला होता. अनेक घडामोडीनंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहून राजेश लाटकर यांना आमदार करण्याची भावना खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार माजी आमदार छत्रपती मालोजीराजे गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जिह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी आता सक्रिय होतील. तसेच उत्तर मतदारसंघात लाटकर यांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते ताकदीने एकजुटीने प्रचारात उतरतील. असेही माजी आमदार मालोजीराजे यांनी स्पष्ट केले.

मधुरिमाराजे छत्रपती यांनी यापुढेही आपण कार्यकर्त्यांच्या सुखदु:खात सहभागी आहोत. कार्यकर्त्यांची कोणतीही काम असो राजघराण्याचे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमी खुले राहतील, असे सांगितले.

आमदार सतेज पाटील यांनी यापूर्वी जे घडले ते मागे ठेवून पुढे जाण्याची भूमिका घेऊया. उत्तरसह जिल्ह्यातील सर्वच महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपण कामाला लागू या असे आवाहन केले. यावेळी माजी उपमहापौर अर्जुन माने, माजी उपमहापौर विक्रम जरग, माजी नगरसेवक राजाराम गायकवाड, माजी नगरसेवक शिवाजी कवाळे, माजी नगरसेवक रवी आवळे, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, शशिकांत पाटील, शिवानंद बनछोडे यांच्यासह छत्रपती घराण्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्तेसाठी लाचार झालो नाही : मालोजीराजे
आम्ही आजपर्यंत कधीही सत्तेसाठी लाचार झालो नाही. सत्तेसाठी कुठलीही तत्व बाजूला ठेवली नाहीत. या विधानसभेच्या निवडणूकीतही हेच दाखवून दिले आहे. याचबरोबर 2014 पासून प्रत्येक निवडणूक काँग्रेससोबतच राहिलो आहे. आताही राजेश लाटकर यांचाच प्रचार करणार असल्याची स्पष्टोक्ती माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी दिली. कार्यकर्त्यांनीही हेवेदावे बाजूला ठेवून लाटकारांच्या विजयासाठी एकजुटने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article