मल्लिका शेरावतचा झाला ब्रेकअप
फ्रेंच व्यक्तीसोबत होती रिलेशनशिपमध्ये
प्रसिद्ध अभिनेत्री मल्लिका शेरावतने मर्डर चित्रपटाद्वारे मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता. अभिनेता इमरान हाशमीसोबतच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. अभिनयाच्या कारकीर्दीसोबत मल्लिका ही स्वत:च्या खासगी आयुष्यावरून चर्चेत असते. अलिकडेच तिने स्वत:चा ब्रेकअप झाल्याचे जाहीर केले आहे. माझा ब्रेकअप झाला आहे हे खरं आहे. दीर्घकाळापासून मी आणि सिरिल ऑक्सेनफॅन्स एकत्र होतो आणि आता वेगळे झालो आहोत. सद्यकाळात एक योग्य व्यक्तीचा शोध घेणे अत्यंत अवघड आहे. मी याप्रकरणी अधिक बोलू इच्छित नाही. परंतु मी सध्या पूर्णपणे सिंगल असल्याचे तिने म्हटले आहे. मी विवाहसंस्थेच्या बाजूने नाही तसेच विरोधात देखील नाही. मी याची पर्वाच करत नाही. दोन लोक परस्परांमध्ये काय इच्छितात हेच महत्त्वाचे आहे असे म्हणत तिने ब्रेकअपची पुष्टी दिली आहे. मल्लिकाने दीर्घकाळापर्यंत प्रेंच नागरिक सिरिल ऑक्सेनफॅन्सला डेट केले होते तसेच त्याच्यासोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. ती सिरिलसोबत पॅरिसमध्ये शिफ्ट देखील झाली होती. सिरिल हा मोठा उद्योजक असून रियल इस्टेटच्या क्षेत्रात गुंतवणूकदार म्हणून त्याला ओळखले जाते.