For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दादांच्या दूरदृष्टीतून मलकापूर हे आधुनिक शहर उभारतेय

05:27 PM Dec 04, 2024 IST | Radhika Patil
दादांच्या दूरदृष्टीतून मलकापूर हे आधुनिक शहर उभारतेय
Malkapur is building a modern city based on Dada's vision.
Advertisement

कराड : 
बहुजन समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे, समाजाच्या वाढीमध्ये व प्रगतीमध्ये हातभार लागावा या उद्देशाने स्वर्गीय भास्करराव शिंदे यांनी शिक्षण संस्थेची उभारणी केली. या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील मुलांना चांगले शिक्षण मिळत आहे. त्याचबरोबर मलकापूरच्या विकासाचा ध्यास घेऊन भास्करराव शिंदे यांनी कार्य केले. त्यांच्या विकासाचा व कार्याचा वारसा मनोहर शिंदे पुढे चालवत आहेत. आजवर राबवलेल्या विविध योजना आणि  उपक्रमांमुळे मलकापूरच्या रूपाने आधूनिक नगर उभा राहत आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

Advertisement

 स्वा. सै. स्वर्गीय भास्करराव शिंदे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित  मलकापूर येथील श्री लक्ष्मी देवी शिक्षण संस्थेच्या वतीने आगा†शवनगरमधील शाळेमध्ये आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील होते. यावेळी मनोहर शिंदे, इंद्रजीत चव्हाण, माजी नगराध्यक्षा नीलम येडगे, अजितराव पाटील चिखलीकर, प्रताप कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते विविध  क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला.

 पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्व. भास्करराव शिंदे यांना मायफ्रेंड नावाने ओळखले जात होते. त्यांनी शिक्षण संस्थेच्या रूपाने लावलेले रोपट्याचा आज वटवृक्षामध्ये रूपांतर होताना दिसत आहे. या शिक्षण संस्थेमध्ये मलकापूर, आगा†शवनगरसह ढेबेवाडी परिसरातील हजारो मुले शिक्षण घेत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. मुलांना आधा†नक व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. आपल्या देशातील विश्वाविद्यालयांमधून अपेक्षित गुणवत्ता प्राप्ती शिक्षक व संशोधन होताना दिसत नाही. तसेच शिक्षण संस्था व शासन पातळीवरही त्या दृष्टीने लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. असे असले तरी शिक्षणाच्या  आपल्या देशामध्ये भरपूर काम झाल्याचे दिसून येत आहे. शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी व भा†वष्यात मुलांना चांगले ज्ञान मिळावे या दृष्टीने शिक्षण संस्थांनी प्रयत्न करावेत.

Advertisement

 श्रीनिवास पाटील म्हणाले, मायफ्रेंड स्वर्गीय भास्करराव शिंदे यांनी मलकापूरच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे. येथील गोरगा†रबांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून शिक्षण संस्थेची उभारणी केली. त्या शिक्षण संस्थेमध्ये आज हजारो मुले शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रामध्ये आजवर झालेल्या अनेक मुख्यमंत्र्यांमध्ये सातारा जिह्याने महाराष्ट्राला सर्वात जास्त मुख्यमंत्री दिले आहेत. भास्करराव शिंदे यांच्यामुळे मलकापूरच्या विकासाला गती प्राप्ती झाली असून भा†वष्यात कराड महानगरपालिका झाल्यानंतर कराड मलकापूरसह शहरालगतची उपनगरे व अनेक गावांचे महत्त्व वाढणार आहे. त्यावेळी भास्करराव शिंदे यांनी सुरू केलेली ही शिक्षण संस्था मोठ्या स्वरूपात नावारूपाला आलेली दिसून येईल.

Advertisement
Tags :

.